Anil Deshmukh : मनी लाॅंड्रींग केस प्रकरणी तुरुंगात असणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांना जामीन मंजूर केला आहे. तब्बल ११ महिन्यानंतर आज ते त्यांच्या घरी जात आहेत. तब्येतीचा दाखला देत न्यायालयात त्यांनी अर्ज केला होता. त्यांची १ लाखाच्या जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
जामीन मिळूनही अनिल देशमुखांच्या सुटकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. ईडीकडून दाखल गुन्ह्यात जामीन, मात्र सीबीआयकडूनही देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे त्या गुन्ह्यातही त्यांना जामीन मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Previous ArticleDasra Festival Kolhapur : शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीट आज सुरू; विविध कलांचे आणि खाद्यपदार्थांची पर्वणी
Next Article अखेर मालवणातील जलपर्यटनास एका दिवसापुरती मुभा
Related Posts
Add A Comment