मान्सूनच्या सरी गोवा आणि दक्षिण कोकणात दाखल झाल्या आहेत. कोकणात वेंगुर्ला येथे काल माँन्सूनच्या सरी कोसळल्याचे हवामान विभाग आणि पुणे वेधशाळेनं स्पष्ट केले.
मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्र, संपूर्ण गोवा, कोकणाचा काही भाग आणि कर्नाटकच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे. पुढील काही दिवसांत तो मध्य अरबी समुद्र, दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, दक्षिण आंध्रप्रदेश, मध्य पश्चिम आणि वायव्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, तसेच तामिळनाडूच्या उर्वरित भागात पुढे सरकेल. तशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागानं सांगितले आहे.