आयपी 68 अंडरवॉटर प्रोटेक्शनसह 6.55 इंच 3डी कर्व्हड डिस्प्ले मिळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्मार्टफोन निर्मिती कंपनी मोटोरोलाने भारतात ‘मोटोरोला एज 40’ हा 5-जीवर आधारीत स्मार्टफोन सादर केला आहे. यामध्ये आयपी 68 अंडरवॉटर प्रोटेक्शनसह हा जगातील सर्वात कमी जाडीचा 5 जी स्मार्टफोन राहणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
8 जीबी रॅम आणि 265जीबी स्टोरेजसह येणाऱ्या फोनची किमत 29,999 रुपये राहणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. हा स्मार्टफोन खरेदी करावयाचा असल्यास मंगळवारपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आणि ई कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर प्री ऑर्डरसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. याला 50 मेगापिक्सलचा पॅमेरा असणार आहे. 4400 एमएएचची बॅटरीही या फोनमध्ये समाविष्ट आहे.

स्मार्टफोनमधील फिचर्स :
सेगमेंटमध्ये 144 एचझेड 3डी कर्व्हड 6.55 इंचाचा एफएचडी प्लस प्रोओल्ड डिस्प्ले 360 एचझेड टच सॅम्पलिंग रेट आणि एचडीआर10 प्लस साठी सपोर्ट राहणार आहे.
कॅमेरा : 50 एमपी प्राथमिक कॅमेरा आणि 13 एमपी अल्ट्रा वाइड व मायक्रो व्हिजन लेन्स आहे.
बॅटरी व चार्जिंग : पॉवर बॅकअपसाठी यामध्ये 68 डब्लू जलद चार्जिंग सपोर्टसह 4400एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे.
कनेक्टिव्हिटी पर्याय : इन डिस्प्ले, फिंगरप्रिंटससह चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 14 5जी बँड, 4जी, 3जी वायफाय, ब्लूट्यूथ, जीपीएस, एनएफसी आदी सुविधा मिळणार