कोल्हापूर : “2019 लोकसभेपूर्वी माने गट आडगळीत पडला होता. त्यांच्या इतिहास पाहिला तर याआधी देखील त्यांनी विश्वासघात केला. असा मानेंचा विश्वासघाताचा इतिहास असताना त्यांना मातोश्रीने प्रवक्ता आणि खासदार पद दिले. शिवसैनिकांनी कधीच त्यांच्याकडे फुटक्या कवडीची अपेक्षा केली नाही. त्यांची शेपूट वाकडी ती वाकडीच राहिली. पण त्यांना आता जागा दाखवली पाहिजे. केवळ उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली म्हणून मानेंना निवडून दिले. पण मानेंची चाल बदलली नाही.” असा घणाघात सुषमा अंधारे यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर केला. त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची कुरुंदवाड इथे झालेल्या महाप्रबोधन यात्रेत त्या बोलत होत्या.
सुरवातीला अंधारे यांनी, “आपण लाव रे तो व्हिडिओ म्हणून उर्मट वागायचं नाही, आपण दादा! लावा तो व्हिडिओ असे म्हणून नम्रतेने म्हणायचं.” असे म्हणत शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्या भाषणाला कुरुंदवाड इथं सुरवात झाली. यावेळी कोव्हीड काळातील ठाकरे सरकारच्या कामगिरीचा आढावा देणारा व्हिडिओ दाखवण्यात आला. व्हिडिओच्या माध्यमातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली.
भाजपने द्वेषमुलक राजकारण सुरु केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वेषमुलक राजकारण संपवू पाहतात. पण त्यासाठी प्रयत्न करत नाहीत. मात्र ते वाढवण्यासाठी आपली अमराठी टीम तयार करत आहे. त्यासाठी किरीट सोमया, राणा या लोकांना उभे करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांचे सुरु असल्याचा घणाघाती सुषमा अंधारे यांनी केला.
“या राज्यात महिलांना तूच्छ मानण्याचं काम सुरु झाले. म्हणून समतेचा विचार महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे. महिला पत्रकारांना गलिच्छ भाषेत बोलणाऱ्यांना पंतप्रधान फॉलो करतात. बाजूला व्हा म्हंटल की विनयभंगाचा गुन्हा दाखल करतात.” असा टोला अंधारे यांनी शिंदे -भाजप सरकार यांना लागवला.
“गोड बोल्या आणि साखर झेल्या म्हणजे दीपक केसरकर होय. पण हिंदुत्व शिकवणाऱ्या केसरकरांना महिलांना गलिच्छ भाषेत बोलणाऱ्याना हिंदुत्व दिसत नाही का? एक भगिनी खासदार राहुल शेवाळे यांच्याबरोबरचा व्हिडिओ रिलीज केला. तिच्या जीवाला धोका असतो, त्यावेळी त्यांना हे हिंदुत्व दिसत नाही का?” असा सवाल अंधारे यांनी केला.
“नारायण राणे यांची दोन पोरं छोटी आहेत, त्या छोट्या पोरावर मी बोलणार नाही. ही छोटी पोरं काहीही बोलतात पण उपमुख्यमंत्री फडणवीस काही बोलत नाहीत. गुलाबराव पाटील बावचळलेत, त्यांच्यावर न बोलले बरे, अब्दुल सत्तार महिला बाबत काहीही बोलतात, पण त्यांच्यावर फडणवीस काही करत नाहीत.” असा निशाणा अंधारे यांनी साधला.
“विजय बापू म्हणाले खोक्यावर बोलायचे नाही. आम्ही खोक्याबद्दल बोलायचे नाही, खोके गुवाहटीला गेले नव्हते.” अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी शिंदे सरकारवर केली. शिंदे सरकारची निवडणूक आयोगासोबत साठेबाजी आहे. मेळाव्यात तलवार लॉन्च केली. ज्यांनी शिवसेना सोडली त्यांनी केवळ पक्षाचा विश्वासघात नाही केला. तर जनतेचा विश्वासघात केला.
Related Posts
Add A Comment