ऑनलाईन टीम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पुन्हा एकदा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एमपीएससीने परिपत्रक काढून यासंदर्भातली माहिती जाहीर केली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं या परिपत्रकावर नमूद करण्यात आले आहे. तर, परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असं देखील या पत्रकामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे MPSC च्या उमेदवारांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे.
गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ११ ऑक्टोबर ला परिक्षा घेण्याचं ठरले. उमेदवारांनी याची तयारी देखील सुरू केली. पण मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबितच असल्यामुळे ती पुढे ढकलण्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली होती. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर १ नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि २२ नोव्हेंबरला होणाऱ्या दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण आहे.
Related Posts
Add A Comment