महाराष्टाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एका मुलाखतीत महाविकास आघाडीच्या (MVA) काळात मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला असे विधान केले. या कामासाठी तत्कालीन पोलीस कमिशनर संजय पांडे (Sanjay Pande) यांना महाविकास आघाडीने सुपारी दिली होती असा खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. त्यावर आता महाविकास आघाडीसह राज्यातील विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavartene) यांनी फडणवीसांच्या अटकेचा कटामागे शरद पवार यांचा हात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खाजगी चॅनलच्या कार्यक्रमात आपल्या अटकेसाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न केला गेल्याचा खुलासा केला. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी फडणवीसांच्या अटकेचा कट शरद पवार यांनी रचना केली असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “माजी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या तोंडून काल ‘कट’ असा एक शब्द निघाला असून त्या शब्दाचा मतितार्थ लक्षात घेतला पाहिजे. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मला अटक करण्यात आली असताना त्या अटकेनंतर एक श्रृंखला सुरू झाली. पोलिसांना माहिती होतं की मी कोर्टात युक्तीवाद करत होतो. मात्र, त्यांच्या डोक्यात वेगळंच शिजत होतं. अटकेनंतर ते माझ्या लक्षात आलं”, अशी प्रतिक्रिया वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.
“निनोटपालांची डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आल्यावर ते वारंवार मला लॉकअपमधून बाहेर काढत होते. मला एका ठिकाणी बसवलं जायचं आणि चर्चा केली जायची. या चर्चेत शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याची कमी आणि इतर गोष्टींची जास्त होत्या. नागपूर, आरएसएस, राईटविंग आणि देवेंद्र फडणवीसांची भेट याच मुद्द्यांभोवती तपास फिरवला जात होता.” असा खुलासा गुणरत्ने सदावर्ते यांनी केला.
Related Posts
Add A Comment