
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नोत्सवनिमित्त मि. रोटरी जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत रुद्रा जीमच्या नागेंद्र माडीवाळने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. रोटरी हा मानाचा किताब मिळविला. तर एसएस फौंडेशनच्या उमेश गंगनेने उत्कृष्ट पोझर हा किताब पटकाविला. मि. वर्ल्ड अनुजकुमार तालियान व केतकी पाटील यांनी आपल्या शरीराची प्रात्यक्षिके सादर केली.
सदर स्पर्धा आयबीबीएफच्या नियमानुसार 55 किलो ते 80 वरील गटात अशा 7 वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. 55 किलो गट – 1) आकाश निंगराणी (चॅम्पियन) 2) जोतिबा सावंत (बी स्ट्राँग) 3) रोहन अलूर (कार्पोरेशन) 4) मंदार देसाई (आरसी फिटनेस) 5) जोतिबा बिर्जे (भवानी). 60 किलो गट – 1) उमेश गंगने (एसएस फौंडेशन) 2) मंजुनाथ सोनटक्की (बॉडी वर्क) 3) मंजुनाथ कलगटगी (फ्लेक्स) 4) हेमंत शंभूचे (कार्पोरेशन) 5) आकाश हवालकोड (रॉयल). 65 किलो गट – 1) विकास शहापूरकर (बॉडी वर्क) 2) रोहन पालणकर (बॉडी टोन) 3) मंथन धामणेकर (बॉडी बेसिक) 4) विनायक अनगोळकर (बॉडी बेसिक) 5) किरण पोवार (मोरया). 70 किलो गट – 1) प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव) 2) महेश गवळी (रुद्र) 3) सुनिल भांतकांडे (एक्सस्ट्रिम) 4) अरबाज वाटंगी (फॅक्ट्री) 5) संदीप पावले (मॉडर्न). 75 किलो गट – 1) नागेंद्र माडीवाळ (रुद्र) 2) विजय पाटील (बी स्ट्राँग) 3) राहुल हिरोजी (युनिव्हर्सल). 80 किलो गट – 1) अफ्रोज ताशिलदार (गोल्ड) 2) सनी मयेकर (केएचपी) 3) गजानन काकतीकर (एसएसएस फौंडेशन) 4) ओमकार कडेमणी (बॉडी वर्क) 5) शिव मयेकर (केएचपी). 80 किलोवरील गट – 1) विशाल चव्हाण (लाईफ टाईम) 2) व्ही. बी. किरण (कार्पोरेशन) 3) दयानंद निलजकर (बॉडी बेसिक) 4) संतोष कालकुंद्रीकर (फिट पॉवर) 5) रविंद्र नाईक (मोरया) यांनी विजेतेपद पटकाविले. त्यानंतर मि. रोटरी किताबासाठी आकाश निंगराणी, नागेंद्र माडीवाळ, प्रताप कालकुंद्रीकर, विकास शहापूरकर, उमेश गंगने, अफ्रोज ताशिलदार व विशाल चव्हाण यांच्यात लढत झाली. त्यामध्ये आपल्या पिळदार भक्कम शरीराच्या जोरावर रुद्र जीमच्या नागेंद्र माडीवाळने मि. रोटरी हा मानाचा किताब पटकाविला. तर एसएस फौंडेशनच्या उमेश गंगने संगीताच्या तालावर उत्कृष्ट पोझिंगद्वारे उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला.
विजेत्यांना प्रमुख पाहुणे शिरीष गोगाटे, रोहिणी गोगटे, हरी शेट्टी, उमा शेट्टी, अविनाश पोतदार, नितीन शिरगुरकर, बसवराज विभुती, पराग भंडारी, मनोज पै, योगेश कुलकर्णी, अक्षय कुलकर्णी, अजित सिद्धन्नावर, सुहास चंडक, मनोज मायकल, एम. के. गुरव, एम. गंगाधर, जे. डी. भट, कृष्णा चिक्कतुंबळ यांच्या हस्ते विजेत्या नागराज मडिवाळ व उत्कृष्ट पोझर उमेश गंगने याला मानाचा किताब, आकर्षक चषक, रोख रक्कम, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी मि. वर्ल्ड आर्मीच्या अनुजकुमार तालियान व केतकी पाटील यांनी आपल्या शरीराची प्रात्यक्षिके सादर केली. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्धन्नावर, जे. डी. भट्ट, एम. के. गुरव, सुनिल आपटेकर, गंगाधर एम., वासुदेव साखळकर, बसवराज अरळीमट्टी, आदींनी काम पाहिले.