ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी महसूलमंत्री असताना राज्य सरकारच्या एका प्रिमियर कंपनीची (premier company) 86 एकर जमीन अवघ्या 12 कोटी रुपयांना अनंत डेव्हलपर्सला (anant developer) विकली. या व्यवहारातून राणेंनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. आरटीआय कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी पोलिसांत याबाबत तक्रार दिली होती. दरम्यान ठाण्यातील एसीबीने आता या प्रकरणाच्या खुल्या चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे राणेंच्या चौकशीत वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रीमियर कंपनीवर 186 कोटींचा बोजा असताना राणेंनी ही जमीन अवघ्या 12 कोटी रुपयांना अनंत डेव्हलपर्सला विकली. खोटा जीआर करून त्यांनी ही जमीन विकली असल्याचा आरोप करत आरटीआय तक्रारदार प्रदीप भालेकर यांनी केला आहे. या संपूर्ण भ्रष्टाचाराची लोकायुक्त-महाराष्ट्र राज्य यांच्याकडेही तक्रार दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणात नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाची सखोल चौकशी करुन बेहिशोबी संपत्ती सीज करावी, अशी मागणी होत होती. दरम्यान ठाण्यातील एसीबीने या प्रकरणाच्या खुल्या चौकशीचे आदेश दिले आहेत.