प्रतिनिधी,रत्नागिरी
शहरालगतच्या नाचणे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील रस्त्यावर रिक्षामधून 55 हजार रूपयांच्या अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्य़ा गुरूवारी रात्री 8 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघा संशयितांविरूद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
प्रवीण प्रकाश परब (37, रा.गवळीवाडा रत्नागिरी) व ओंकार जगदीश बोरकर (26, रा.चिंचखरी रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नाचणे येथे अंमली पदार्थांची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 16 फेबुवारी 2023 रोजी रात्री 8 च्या सुमारास नाचणे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे संशयास्पदरित्या रिक्षा (एमएच 08 एक्यू 4710) ही आढळून आली.
पोलिसांनी रिक्षामध्ये बसलेल्या दोन्ही संशयितांची चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवी उत्तरे पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्या दोघांची कसून तपासणी केली असता रिक्षामध्ये अंमली पदार्थ असल्याचे आढळल़े यामध्ये 3 पांढऱ्या रंगाच्या प्लास्टीकच्या पुड्या व 5 तपकिर पांढऱ्या रंगाच्या पुड्या ज्यांचे वजन 10 ग्रॅम असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. एकूण 8 पुड्यांची किंमत 55 हजार रूपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Previous ArticleRatnagiri : लोटेत टँकरखाली चिरडून 75 वर्षीय वृद्धेचा मृत्यू
Related Posts
Add A Comment