वार्ताहर /नंदगड
कारलगा हायस्कूल कारलगा येथे शनिवारी राष्ट्रीय पोषण अभियान आहार मेळावा भरविण्यात आला होता. याप्रसंगी गावातील नागरिकांनी शाळेला भेट देऊन सहभाग दर्शविला. ग्राम पंचायत उपाध्यक्ष रवींद्र सुतार, परशराम घाडी, संजय पाटील, गणपती पाटील, मनोहर पाटील, गणपती पाटील, प्रभाकर पाटील, अरुण नलावडे व बबलू कामती यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. एम. पाटील, श्रीमती ए. एम. लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांना पोषक आहाराचे महत्त्व समजले पाहिजे. यासाठीच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे शेखर पाटील यांनी यावेळी सांगितले. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग अतिशय उत्साही होता. राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यासाठी कारलगा हायस्कूलचे शिक्षक एस. के. पाटील, आर. एन. घाडी, जे. जे. होसूर, पी. डी. कदम, ए. डी. घाडी, व्ही. एन. पाटील व एम. एम. गुरव आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले होते.