ऑनलाईन टीम / मुंबई :
मागासवर्गीय असल्याने मला कोठडीत हीन दर्जाची वागणूक देण्यात आली. पिण्यास पाणीही दिले जात नव्हते, असे आरोप खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी केले होते. राणा यांनी यासंदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (om birla) यांनाही पत्र लिहिलं आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याला खार पोलीस ठाण्यात कशी वागणूक दिली, याचा व्हिडिओ ट्विट करत पोलीस आयुक्त संजय पांडे (sanjay pandey) यांनी या आरोपांची पोलखोल केली आहे.
23 एप्रिल रोजी नवनीत राणा यांना खार पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यातच रात्र काढावी लागली. यावेळी कोठडीत आपल्याला पिण्यासाठी पाणी दिलं नाही. वॉशरुमलाही जाऊ दिलं नाही, असा गंभीर आरोप राणा यांनी खार पोलिसांवर केला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खार पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजची एक क्लीप ट्विट केली. “आणखी काही बोलण्याची गरज आहे का?” अशा कॅप्शनखाली पांडे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत पोलीस ठाण्यात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे चहा पिताना दिसत आहेत. त्यांच्यासमोर पाण्याची बाटलीही असल्याचं या दिसत आहे. त्यामुळे राणा यांच पितळ उघड पडल्याचं या व्हीडिओमधून दिसून येत आहे.