ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिंदे यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडे आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. आगामी निवडणुकांची तयारी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली असतानाच शिंदे यांचा राजीनामा पक्षासाठी धक्कादायक आहे. आता पक्षश्रेष्ठी जिल्हाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळय़ात टाकणार? याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे.
अधिक वाचा : ‘अग्निपथ’ योजनेविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या