कागल (कोल्हापूर) : नगरविकास मंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करीत होते. कागलबरोबरच गडहिंग्लज, मुरगुड (Gadhinglaj Murgud) या शहरांसाठी मी विकासकामांनां जेवढा निधी मागितला,तेवढा त्यांनी दिला आहे.शिंदेंनी माझा नेहमीच सन्मान केला अस म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं कौतुक करुन त्यांचं जाहीर आभार मानलेत.श्रमीक वसाहतीमधील मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आपल्या भाषणात शिंदेंचं तोंडभर कौतुक केले. त्यामुळं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय.
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळं शिवसेना आणि शिंदे गटात वाद पेटला असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री शिंदे यांचं कौतुक केलं जात आहे. आज हसन मुश्रीफांनी कौतुक करताच राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय.एकनाथ शिंदे आज जरी विरोधी सरकारचे मुख्यमंत्री असले तरी कागलला कोट्यवधी रूपयांचा विकास निधी दिला.याबद्दल मला जाहीर आभार मानलेच पाहिजेत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
Previous Articleइस्माचा अहवाल : देशात 2.45 लाख हेक्टर ऊसक्षेत्रात वाढ
Next Article सांबरा रोडवर सांडपाणी रस्त्यावर
Related Posts
Add A Comment