NCP President Sharad Pawar entered Vengurle
वेंगुर्ले /वार्ताहर-
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात बॅ. नात पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमास खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार हे सरकारी 10:40 वेंगुर्लेत दाखल झाले.
शरदचंद्रजी पवार यांचे वेंगुर्ले नगरीत आगमन होताच बॅ. खर्डेकर कॉलेज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव सौ नम्रता पवार, अँथोनी डिसोजा, नितीन कुबल व अन्य पदाधिकाऱ्यांनी यांनी शरद पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यात जिल्हा सदस्य नितीन कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माजी संचालक प्रज्ञा परब राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक सेलचे अध्यक्ष अँथोनी डिसोजा, राष्ट्रवादी शहर सचिव स्वप्निल रावळ योगेश कोबल शेतकरी संतोष गाडगीळ अनिकेत कुंडगीर भरत आवळे वेंगुर्ला तालुका शिवसेनाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, वेंगुर्ले तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष विधाता सावंत आदींचा समावेश होता.