किंग्स्टन / वृत्तसंस्था
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद सोमवारी जमैका दौऱ्यावर दाखल झाले. विमानतळावर राष्ट्रपती कोविंद यांचे जंगी स्वागत करण्यात आले. स्वागतप्रसंगी जमैकाचे पंतप्रधान अँड्रय़ू हॉलनेस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ रिअर ऍडमिरल अँटोनेट वेमिस-गोरमन, जमैकामधील भारताचे उच्चायुक्त आर. मासाकुई आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सात दिवसांचा कॅरेबियन देशांचा दौरा करत आहेत. कॅरेबियन देशांना भेट देणारे ते भारताचे पहिले राष्ट्रपती ठरले आहेत. राष्ट्रपतींसह या दौऱयात केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि खासदार सतीशकुमार गौतम व रमादेवी यांचाही समावेश आहे. या दौऱयात ते जमैका, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडा या देशांना भेट देतील. याप्रसंगी ते जमैका संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर भाषण करणार आहेत. तसेच वेस्ट इंडिज क्रिकेट संघातून खेळणाऱया जमैकाच्या खेळाडूंचीही भेट घेणार आहेत. या खेळाडूंना त्यांच्याकडून क्रिकेटची साधने भेट दिली जाणार आहेत.