ऑनलाईन टीम/तरुण भारत
नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी (NIA) ने बुधवारी दोषी असलेला काश्मिरी फुटीरतावादी आणि प्रतिबंधित जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) चा नेता यासिन मलिक (Yasin Malik) याला दहशतवादी फंडिंग प्रकरणात फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे, अशी माहिती पीटीआयने दिली आहे. तर २०१७ मध्ये काश्मीरमध्ये दहशतवादी फंडिंग, दहशतवाद पसरवणे आणि फुटीरतावादी कारवायांशी संबंधित आरोपांसाठी दिल्ली न्यायालयाने गेल्या आठवड्यात मलिकला दोषी ठरवले होते. यावेळी न्यायालयाने शिक्षेवर चर्चेसाठी २५ मे ही तारीख निश्चित केली होती. मलिकवर लावण्यात आलेल्या कलमांनुसार त्याला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा किंवा किमान जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
१० मे रोजी यासीनने न्यायालयात सांगितले की, तो त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना आव्हान देऊ इच्छित नाही. यासिनवर UAPA च्या कलम १६ (दहशतवादी कृत्य), कलम १७ (दहशतवादासाठी पैसा गोळा करणे), कलम १८ (दहशतवादी कृत्यांसाठी कट आखणे) आणि कलम २० (दहशतवादी गटाचा सदस्य असणे) असे आरोप ठेवण्यात आले आहेत. याशिवाय त्याच्यावर कलम १२० बी (गुन्हेगारी कट) आणि कलम १२४ ए अंतर्गत (देशद्रोह) आरोप आहेत.
दिल्लीतील विशेष न्यायालय लवकरच जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवणार आहे. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी १९ मे रोजी यासिनला बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) सर्व आरोपांसाठी दोषी ठरवले होते. यासिन मलिकच्या खटल्याच्या सुनावणीमुळे पटियाला हाऊस कोर्टात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.