कल्लेहोळ येथील विकलांग व्यक्तींना कोणत्याच सुविधा सुळगा – हिंडलगा ग्रामपंचायतीत मिळत नाहीत. याबाबत विचारणा केली असता, विकलांगांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला आहे. तेव्हा संबंधित पीडीओवर कारवाई करावी, अशी मागणी कल्लेहोळ येथील विकलांग तरुणाने अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सुळगा ग्रामपंचायतीतील पीडीओ वीणा हलवाई यांनी ही धक्काबुक्की केली आहे. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावर कल्लाप्पा साळुंखे, परशुराम खांडोलकर, स्वयं लामजी, गणपत वेताळ, राजू वेताळ, दामू कित्तूर, सिंधुताई पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.