6,999 रुपयांमध्ये लाँच : एचडी डिस्प्लेसह अन्य व्हर्च्युअल रॅमचीही सुविधा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एचएमडी ग्लोबल यांनी भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. यामध्ये त्यांनी आपला नवीन स्मार्टफोन ‘नोकिया सी 12 प्रो’याचे सादरीकरण केले आहे. कंपनीने फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर व 2 जीबी व्हर्च्युअल रॅम व 6.3 इंच असणारा एचडी डिस्प्ले दिलेला आहे.
एचएमडीने नोकिया सी12 प्रोला दोन मेमरीमध्ये सादर केले आहे. यामध्ये 2 जीबी रॅम व 64 जीबी रॅम याची किमत ही 6,999 रुपये आणि 3 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेजसह येणाऱ्या फोनची किमत ही 7,499 रुपये ठेवली आहे.
ग्राहकांना या स्मार्टफोनची खरेदी करण्यासाठी लिडिंग ई कॉमर्स साइट हदक्ग्a.म्दस् आणि रिटेल स्टोअरला भेट देता येणार आहे. नोकिया सी 12 प्रो लाइट मिंट चारकोल व डार्क सियान कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
60 वर्षात पहिल्यांदा बदलला नोकियाचा लोगो
कंपनीने 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच लोगोमध्ये बदल केला आहे. जुना लोगो डार्क ब्लू कलरमध्ये होता परंतु नवीन लोगो हा टेक्स्टला निळ्या रंगासोबत पांढरा रंगही दिला आहे.
फिचर्स :
? नोकिया सी12 प्रो स्मार्टफोन 2 जीबी व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजीसह येणार
? रॅम पॉवरमध्ये 4 जीबी व मोठ्या मॉडेलमध्ये 5 जीबीपर्यंत वाढविण्याची सोय
? नोकिया सी 12 प्रोमध्ये 6.3 इंच एचडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले