तरुणभारत ऑनलाइन
कोल्हापूर(जयसिंगपूर): जून महिन्यात पावसाने दडी मारल्यानंतर दुपारपेरणीचे संकट येते की काय असा सवाल माझ्यासह शेतकऱ्यांना पडला होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. मात्र पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी मी नेहमीच सज्ज असतो. त्यामुळे आता संपर्काबाहेर जात नाही. मी लोकांच्या सेवेसाठी तयार आहे. अशी प्रतिक्रिया आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यानंतर ते मंगळवारी जयसिंगपूर येथे दाखल झाले. त्यानंतर बुधवारी ही प्रतिक्रिया दिली आहे.
बॉस इज ऑलवेज राईट
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद यड्रावकर यांना मिळेल अशी चर्चा जोर धरू लागली आहे. त्यावर यड्रावकर यांना विचारले असता, ‘बॉस इज ऑलवेज राईट’! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आम्हाला त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. त्यांनी ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत त्यांचा अभ्यास आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देतील, असा विश्वास यड्रावकर यांनी व्यक्त केला.