डिजिटल मीडियाचे नियंत्रण करण्यासाठी सरकार लवकरच कायदा आणणार असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे. काल जयपूरमधील एका वृत्तपत्राच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. आता डिजिटल मीडियाशी संबंधित पत्रकारांनाही ओळख मिळेल. ते म्हणाले की, पूर्वी बातम्यांचे प्रसार एकतर्फी होते, परंतु आता इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विकासामुळे ते बहुआयामी झाले आहे.
प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने आपले काम करावे आणि भीतीचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण करू नये असे आवाहन केले. ते म्हणाले की, व्यवसाय करण्यास सुलभता आणि दैनंदिन जीवनात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे आणि कंपन्यांच्या नोंदणी प्रक्रियेतील बदल हे या दिशेने टाकलेले पाऊल आहे.
यावेळी बोलताना राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा म्हणाले की, मीडिया हा लोकशाहीचा सर्वात मोठा दूत आहे आणि पत्रकारितेचा उद्देश संविधानिक मूल्ये आणि लोकशाहीवर विश्वास दृढ करणे आहे.
Previous Articleभगतसिंह कोश्यारी दिल्लीत; राज्यपाल पदावरून उचलबांगडी होणार?
Related Posts
Add A Comment