जमिनीसाठी विविध कंपन्यांचे प्रस्ताव ः गुंतवणूक करण्याचीही तयारी
ग्रेटर नोएडा
आता जगातील दिग्गज आयफोन निर्मितीमधील कंपनी ऍपल भारतामधील ग्रेटर नोएडामध्येही आपल्या आयफोनचे उत्पादन घेणार असल्याची माहिती आहे. याकरीता यमुना अथॉरिटीमधील मोठमोठय़ा कंपन्या जमीन घेण्यासाठी इच्छुक झाल्या आहेत.
या क्रमानुसार ऍपल आणि तीन सहयोगी कंपन्यांही मोबाईल फोन ऍक्सेसिरीज निर्मितीसाठी कारखान्यासाठी यमुना प्राधिकरणात प्रस्ताव सादर केले आहेत. कंपन्यांनी जवळपास 23 एकर जमिनीवर 2,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे. या योजनेतून ऍपल भारतामध्ये आयफोन 16 ची निर्मिती करण्याची योजना बनवत आहे.
यमुना प्राधिकरणाचे अधिकारी मागच्या आठवडय़ात जपान व कोरियातून गुंतवणूक मिळविण्याकरीता गेले होते. ऍपलच्या अधिकाऱयांसोबत बैठकही घेतली आहे. इंक निर्मितीमधील ऍपलची सहयोगी कंपनी सीको ऍडव्हान्स लिमिटेड 850 कोटींची गुंतवणूक करणार आहे आणि हजारो रोजगार प्राप्तीही करणार असल्याचे म्हटले जात आहे.
या अगोदरचा प्रकल्प हा दक्षिण राज्यामध्ये आहे. आताचा हा उत्तर भारतात होणार. आगामी काळात ऍपल जगभरात आपली उत्पादने निर्यात करण्याच्या तयारीत आहे.