इम्रान गवंडी,कोल्हापूर
लग्नसराईत पारंपरीक लग्नपत्रिकेला विशेष महत्व… छापील लग्नपत्रिकांचा दर्जा पाहूनच प्रत्यक्ष लग्नासाठी किती खर्च.. याची चर्चा व्हायची. पण प्रिटींग निमंत्रण पत्रिकांची मागणी कमी होत आहे, तर डिजिटल लग्न निमंत्रण पत्रिकांचा ट्रेंड वाढला आहे. लग्नसराईत व्हिडिओ इन्व्हिटेशनला मागणी वाढली आहे. त्यामुळे निमंत्रण डिजिटल झाले आहे. पारंपरीक छापील लग्नपत्रिकांच्या मागणीत घट झाली असून त्याचा प्रिटींक क्षेत्रातील छोटय़ा व्यावसायिकांना फटका बसत आहे.
व्हिडिओ इन्व्हिटेशन पत्रिका बनवताना प्री-वेडिंग फोटो शुट, वधुवरांचा फोटो, आवडीचे गाणे, संगीत, आकर्षक थीम, थ्री-डी इफेक्ट वापरून त्यात आणखी भव्यता निर्माण केली जाते. त्याद्वारे 20 ते 40 सेकंदांपर्यंतचा व्हिडिओ बनवला जातो. यामध्ये एक व्हिडिओ इन्व्हिटेशन निरनिराळय़ा विविध प्रकारात बनवले जाते. डिजिटल लग्नपत्रिका जेपीजी फाईलमध्ये आकर्षक डिझाईनसह, वधु-वराचा फोटो वापरून हव्या त्या आकारात बनवल्या जातात. लग्नपत्रिकेची जेपीजी फाईल तयार झाली की सोशल मिडियाद्वारे त्या सहजपणे पाठवल्या जातात.
लग्नपत्रिका वाटण्याच्या प्रमाणात घट
एकदा डिजिटल पत्रिका, व्हिडिओ इन्व्हिटेशन बनवून घेतले की मोबाईलद्वारे ते देश-विदेशात कुठेही अमर्याद लोकांपर्यंत सहज पोहोचवता येते. त्यामुळे सध्या लग्नसराईत डिजिटल पत्रिका, व्हिडिओ इन्व्हिटेशनचा ट्रेंड आहे. डिजिटल युगामुळे लग्नपत्रिका वाटण्याचे प्रमाणही घटले आहे.
बारकोड स्कॅनरची व्यवस्था
लग्नात नातेवाईकांकडून वधुवरांना प्रेझेंट पाकीटातून रोख रक्कम किंवा संसारोपयोगी साहित्य दिले जाते. दूरवरच्या गावांतील, परदेशातील पै-पाहुण्यांना किंवा मित्रमंडळींना काही कारणाने लग्नाला यायला जमत नाही. त्यामुळे आहेर देण्यात अडचणी येत होत्या. आता डिजिटल लग्नग्नपत्रिकेवरच बारकोड स्कॅनरची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पै-पाहुणे कितीही लांब असले तरी आहे त्या ठिकाणावरुन बारकोड स्कॅनरद्वारे त्यांना आहेराचे पैसे पाठवणे सोपे झाले आहे.
खर्च कमी अन् वेळेची बचत
काही कारणाने लांबच्या पै-पाहुण्यांना आमंत्रण देण्यासाठी अडचणी येतात. पण डिजिटल युगात मोबाईलमधील व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम ऍपद्वारे आमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे वेळ व पैशाची बचत तर होतेच. शिवाय बाजारात व्हिडिओ इन्व्हिटेशनसाठी 300 रूपयांपासून 2 हजार रूपयांपर्यंत तर डिजिटल जेपीजी फाईल पत्रिका बनवण्यासाठी 100 ते 500 रूपयांपर्यंत खर्च येतो. तो पत्रिका छपाईच्या तुलनेत कमी आहे.
पारंपारिकतेमध्ये आपुलकी व स्नेह
डिजिटल युगातही हौशी लोक पारंपरीक अशी लग्नपत्रिकांची छपाई करतात. या निमंत्रण पत्रिकांमध्ये आकर्षकता असते. ती देताना एकमेकांसोबत प्रत्यक्ष संवादामुळे आपुलकी, स्नेह जपला जातो. बजेटनुसार काहीजण पै-पाहुण्यांना, देवघरात ठेवण्यासाठी मोजक्याच निमंत्रण पत्रिकांची छपाई करतात. बाकीच्या निमंत्रणासाठी डिजिटल पत्रिकांचा वापर केला जातो.
रोजगारावर परिणाम
डिजिटल क्षेत्रातील क्रांतीमुळे ग्राहक व डिझायनर असाच संवाद राहिला आहे. मधल्या फळीतील कागदाची निवड, आकार, छपाई आदीवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगारही घटत आहे.
सर्वेश देवरूखकर, व्हिडिओ-फोटोग्राफर
Trending
- बुथ कमिट्या सक्षम करून सरकार उलथवून टाका; राष्ट्रवादीचे निरीक्षक आमदार शशीकांत शिंदे यांचे आवाहन
- सावर्डेत भवानीच्या डोंगराला भीषण आग; अज्ञाताचे कृत्य, २० ते २५ एकर डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी !
- Sangli : येळवीजवळ कार पलटी होऊन दोन ठार; मृत सांगोला तालुक्यातील
- निवृत्त कर्मचाऱ्याला घरी सोडण्यासाठी सहायक आयुक्त लोंढे यांनी केले सारथ्य
- ‘ब्रजभूषणला अटक करा नाहीतर…- राकेश टिकेत यांचा सरकारला इशारा
- KOlhapur : जिल्हाभरातील विविध रस्त्यांच्या कामासाठी 30 कोटींचा निधी मंजूर
- Kolhapur : गोकुळच्या स्विकृत संचालकपदी राजेंद्र मोरे यांची निवड
- नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीचा निकाल 98.19 टक्के