इचलकरंजी : येथील पंचगंगा नदी पुलावर असलेल्या जुना पुलावर आज सकाळी पाणी आले आहे. महापालिका व आपत्ती व्यवस्थापन समितीने यापूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. दरम्यान पाण्याची पातळी आणखी वाढल्यास इचलकरंजी हुपरी हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.
इचलकरंजी-शिरदवाड मार्गावर असलेला हा पूल महाराष्ट्र व कर्नाटकातील गावांना जोडणारा आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. पूर आल्यानंतर या मार्गावरील पूल वारंवार पाण्याखाली जात असल्यामुळे नवा पूल बांधण्यात आला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या मोठ्या पुलावरूनच वाहतूक सुरू आहे.इचलकरंजीत पंचगंगा नदीची आज सकाळी 10 वाजता पाण्याची पातळी 62 फुट 3 इंचावर इतकी होती. इशारा पातळी 68 फूट तर धोका पातळी 71 फूट आहे.
हेही वाचा- दोन दिवस महत्वाचे; शहरावर पाणी संकटाची टांगती तलवार
आपत्ती व्यवस्थापन कक्ष, फायर फायटर्स जवान, यांत्रीक बोट जवान,रेस्क्यू फोर्स जवान असा ताफा नदीपात्रावर सज्ज ठेवण्यात आला आहे. दरम्यान पाण्याची पातळी 2 फुटाने वाढली तरी इचलकरंजी हुपरी रस्ता बंद होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच इचलकरंजीहून कुरुंदवाडला शिरढोण मार्गे जाणारा रस्ता बंद झाला आहे.
Previous Articleताजमहल निविदेद्वारे बांधला होता का?
Next Article चिपळुणात वाशिष्ठीसह शिवनदीचे पाणी पात्राबाहेर
Related Posts
Add A Comment