सावंतवाडी / प्रतिनिधी
कोलगाव- म्हापसेकरवाडी येथील रामचंद्र तुकाराम म्हापसेकर वय 54 यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे . . आज सकाळी साडेअकरा पूर्वी हा प्रकार घडला .साडेअकरानंतर ही घटना उघडकीस आली .त्यानंतर रामचंद्र यांचा भाऊ साबाची म्हापसेकर यांनी पोलीस ठाण्यात कळवले .घटनास्थळी उपनिरीक्षक डुमिंग डिसोजा यांनी भेट देऊन पंचनामा केला .आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे तपासानंतर आत्महत्येचे कारण समजेल असे डिसोजा म्हणाले.