नवी दिल्ली
ओप्पो कंपनीचा फाइंड एन-2 हा फोल्डेबल फोन येत्या 15 फेब्रुवारीला जागतिक स्तरावर लाँच होणार असल्याची माहिती आहे. सदरच्या फोनचे लाँचिंग लंडनमध्ये होत असून भारतातही लाँच होणार असल्याची माहिती आहे. याचा डिस्प्ले 6.8 इंचाचा 1080 पी अमोलेड असेल. 4 एनएम मीडिया टेक डायमनसिटी 9000 प्लस प्रोसेसर असून फोन 16 जीबी रॅम व 512 जीबी स्टोअरेजसह येणार आहे. अँड्रॉइड 13 वरच्या या फोनची बॅटरी 4300 एमएएचची असेल तर 44 डब्ल्यूचा फास्ट चार्जरही दिला जाणार आहे. डय़ूअल कॅमेरासह येणाऱया या फोनला 50 मेगापिक्सल मुख्य व 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा असेल. तर प्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सलचा असणार आहे.