तिघांच्या शरीरात केले किडनी, लिव्हरचे प्रत्यारोपण : प्रशासनाकडून झिरो ट्रफिकची व्यवस्था
प्रतिनिधी / बेळगाव
ब्रेनडेड झालेल्या एका महिलेच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय त्या महिलेच्या कुटुंबीयांनी घेतला. त्यामुळे तीन जणांना जीवदान मिळाले. 48 वषीय कमलव्वा केलगेरी या महिलेचा धारवाडजवळ कृषी विद्यापीठानजीक अपघात झाला होता. त्यांच्यावर एसडीएम हॉस्पिटल, धारवाड येथे उपचार सुरू होते. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना बेनडेड घोषित केले.
त्यानंतर त्या महिलेच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयवदान करण्याचे ठरविले. त्यापैकी सदर महिलेची किडनी झिरो टॅफिक अंतर्गत केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल बेळगाव येथे आणण्यात आली. दुसरी किडनी केएसडीएम हॉस्पिटल येथे देण्यात आली असून सदर महिलेचे लिव्हर बेंगळूरच्या स्पर्श हॉस्पिटलला विमानाने पाठविण्यात आले. 15 वषीय मुलीने केलेल्या अवयवदानामुळे चार दिवसांपूर्वीच चौघा जणांचे जीव वाचले होते. त्यानंतर लगेच महिलेचे अवयवदान करण्यात आले आहे.
अवयवदानाचा निर्णय झाल्यानंतर ते बेळगावपर्यंत आणण्यासाठी झिरो ट्रफिकची व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी याची व्यवस्था केली. इस्पितळ कर्मचाऱयांनी विनाविलंब किडनी बेळगावला पोहोचविली. ब्रेनडेड झाल्यानंतर इतर अवयव काम करीत होते. त्यावेळी डॉक्टरांनी कमलव्वाचे पती व मुलांना विश्वासात घेऊन त्यांना अवयवदानासंबंधी माहिती दिली.
‘तुमच्या एका निर्णयामुळे तिघा जणांचा जीव वाचू शकतो.’ असे समजावून सांगितल्यानंतर कमलव्वाच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात दाखल झालेल्या 52 वषीय रुग्णाला ती किडनी प्रत्यारोपण करण्यात आली. डॉ. आर. बी. नेर्ली, डॉ. विक्रम प्रभा, डॉ. रितेश वेर्णेकर यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडली. झिरो टॅफिकची व्यवस्था करणाऱया बेळगाव व हुबळी-धारवाड पोलिसांचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली यांनी विशेष आभार मानले आहेत.