
वार्ताहर /किणये
तालुक्मयात गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणहोम, पूजा व महाप्रसादांचे वाटप ठिकाणी करण्यात येत आहे.
गावागावांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपातील गणेशमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. तालुक्मयातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आकर्षक गणेशमूर्ती आहेत. मंडळांनी सामाजिक संदेश देणारे हलते देखावे सादर केले आहेत. यामुळे सायंकाळच्या वेळी सदर देखावे पाहण्यासाठी भक्तांची गर्दी होत आहे.
मंडळांच्यावतीने गावागावांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. भजन, प्रवचन आदी कार्यक्रम होत आहेत. सार्वजनिक मंडळांच्यावतीने गणहोम, पूजा करण्यात येत आहेत. बहुतांश गावांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भक्त मंडळी सढळ हस्ते देणगी देत आहे.
तालुक्मयात सोमवारी दमदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे गणेशमूर्तींचे दर्शन घेताना भक्तांची धावपळ झाली होती. मंगळवारी मात्र पावसाने उघडीप दिल्याने भक्तांच्या उत्साहामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. गणरायाच्या आगमनानंतर तालुक्मयात जल्लोष आणि उत्साह दिसून येत आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी आता केवळ तीन दिवस शिल्लक असल्यामुळे गणेशोत्सव मंडळांच्यावतीने दुपारी किंवा सायंकाळी महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात येत आहे.