४४ मेगावॅट सहविजनिर्मिती : सभासदाना लोकार्पण : अध्यक्ष आ. विनय कोरे
वारणानगर/प्रतिनिधी
देशातील सहकारी आणि महाराष्ट्रातील खाजगी व सहकारी कारखान्यांमधील सर्वात मोठ्या ४४ मेगावॅट क्षमतेच्या वीज निर्मिती प्रकल्प वारणा साखर कारखान्याच्या मालकीचा झाला असून हा त्प सभासदांना लोकार्पण करताना विशेष आनंद होत असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यानी सांगितले.
तेल कोळसा नैसर्गिक वायू या पारंपारिक स्त्रोतापासून ऊर्जा निर्मितीचा जगाच्या पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे तसेच या स्रोतांचा साठा ही मर्यादित असल्यामुळे दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे सोलर, विंड, टायडल, हायड्रो, बायोमास या अपारंपरिक स्त्रोतांपासून निर्माण केलेली अक्षय ऊर्जा म्हणजेच रिन्यूएबल एनर्जी असून पर्यावरण पूरक वसुंधरेच्या रक्षणासाठी अशा विजेची गरज साऱ्या जगाला आहे. आमदार डॉ विनय कोरे अपारंपरिक ऊर्जामंत्री असताना ऊर्जाकुर निधी ट्रस्टची स्थापना झाली आणि राज्याला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे महत्वकांक्षी धोरण आखले गेले याच धोरणांतर्गत शासनाने सहकारी साखर कारखान्यांसाठी बीओटी तत्त्वावर बगॅस पासून सहवीज निर्मिती प्रकल्प उभारण्याचे धोरण ठरविले या धोरणाप्रमाणे भारतामधील सहकारी आणि महाराष्ट्रातील खाजगी व सहकारी या दोन्ही क्षेत्रांमधील देशातील सर्वात मोठा ४४ मेगावॅट क्षमतेचा बगॅस पासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प आज वारणेच्या सभासदांच्या मालकीचा होत असताना वारणानगर मध्ये चैतन्याचे वातावरण होते. २०१० साली ३५० कोटी रुपये भांडवली गुंतवणूक असणारा हा प्रकल्प आजच्या गुंतवणुकीप्रमाणे ८०० कोटी रुपये भांडवली गुंतवणुकीचा झाला आहे असे एक विशाल स्वप्न आमदार डॉ विनय कोरे यांनी पाहिले, उभारले आणि अत्यंत जिद्द आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर सत्यात उतरवले.
प्रकल्पाच्या हस्तांतरणासाठी अनेक संकटांचा सामना करीत असंख्य कायदेशीर बाबींचा पाठपुरावा करत दुर्दम्य आत्मविश्वासाच्या जोरावर आमदार डॉ. विनय कोरे यांनी हे सुराज्य स्वप्न सत्यात उतरवले आहेआणि सहकारमहर्षी स्व तात्यासाहेबांचा सहकार मंत्र सिद्ध केला आहे त्यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.यावेळी नवचंडी यज्ञासाठी आमदार कोरे, सौ शुभलक्ष्मी कोरे यांच्यासह सपत्नीक उपस्थित होते यावेळी सभासदांसाठी या आनंदाप्रीत्यर्थ आयोजीत सुरुचि भोजनाचा वारणा सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांनी याचा आस्वाद घेतला. यावेळी -महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्रशिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री ना.
चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली विशेष भेट
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, सर्व संचालक,कार्यकारी संचालक शहाजी भगत, तात्यासाहेब कोरे नवशक्ती संस्थेचे अध्यक्ष एन.एच. पाटील तसेच सर्व पदाधिकारी जेष्ठ सभासद आर्जा माजी संचालक ,वारणा सहकारी समूहातील सर्व संचालक, पदाधिकार ,आणि कर्मचारी उपस्थित होते.