अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचा दावा ः देखरेखीशिवाय अण्वस्त्रे बाळगत असल्याचा आरोप
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
पाकिस्तान हा जगातील सर्वात धोकादायक देश असल्याचे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी पाकिस्तानचा चेहरा जगासमोर आणला आहे. पाकिस्तान कोणत्याही देखरेखीशिवाय अण्वस्त्रे बाळगत असून त्यांच्याकडे 160 अणुबॉम्ब असल्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. बिडेन यांनी डेमोपेटिक काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात पाकिस्तानला खडे बोल सुनावले. व्हाईट हाऊसने त्यांच्या वक्तव्याबाबत निवेदन जारी केले आहे.
डेमोपेटिक काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमात बिडेन यांनी शनिवारी मोठे वक्तव्य केले. ‘मला वाटते की पाकिस्तान जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक आहे. पाकिस्तानकडे अनेक आण्विक शस्त्र आहेत.’ असे बिडेन म्हणाले. अण्वस्त्रांच्या साठवणुकीबाबत त्यांनी ही टिप्पणी केली. पाकिस्तानमध्ये लष्कर आणि सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळे तो जगासाठी मोठा धोका ठरू शकतो, असे ते म्हणाले. तसेच जिनपिंग यांना आपल्याला खूप समस्या आहेत असे वाटते असे वक्तव्यही त्यांनी केले. चीन आणि रशियाबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर चर्चा करत असतानाच त्यांनी पाकिस्तान आणि चीनबाबत महत्त्वाची निरीक्षणे व्यक्त केल्यामुळे त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम संभवू शकतो.
अमेरिकेच्या राजदूताला पाकिस्तानकडून पाचारण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी पाकिस्तानला जगातील सर्वात धोकादायक देश म्हटल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. दहशतवादाच्या मुद्यावरून जगात आधीच आपली प्रतिमा डागाळणारा पाकिस्तान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या बोलण्याने भडकला आहे. बिडेन यांच्या वक्तव्यानंतर आता पाकिस्तानने अमेरिकेच्या राजदूताला बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी देशाच्या आण्विक क्षमतेबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अमेरिकेने अमेरिकेच्या राजदूताला बोलावण्याचा निर्णय घेतला आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी शनिवारी सांगितले.
अमेरिकन जनरलचाही पाकिस्तानला इशारा
अफगाणिस्तानातून वेगाने सैन्यमाघार घेतल्याने पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची सुरक्षा धोक्मयात येऊ शकते, असा इशारा अमेरिकेचे सर्वोच्च जनरल मार्क मिली यांनी यापूर्वी दिला होता. त्यानंतर आता जग झपाटय़ाने बदलत असून सर्व देश त्यांच्या मित्र राष्ट्रांचा पुनर्विचार करत आहेत, असे सांगत बिडेन यांनीही पाकिस्तानला चपराक देण्याचा विचार चालवला आहे.
युक्रेनला आर्थिक मदत
याप्रसंगी बिडेन यांनी युक्रेनला अतिरिक्त 725 दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत जाहीर केली. या मदतीबाबत रशियाचे वक्तव्य अद्याप आलेले नाही. युपेनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर रशियाने पाश्चात्य देशांसह अमेरिकेला अणुहल्ल्याचा इशारा दिला आहे. यासोबतच नाटो देशांच्या बाजूने अनेक अण्वस्त्रे तैनात करण्यात आली आहेत.
अमेरिकेच्या विधानात विरोधाभास
एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन पाकिस्तानविरोधात वक्तव्य करत आहेत. दुसरीकडे शस्त्रांचा पुरवठा सुरू आहे. लष्करी मदतीशिवाय अमेरिका पाकिस्तानला आर्थिक मदत आणि आयएमएफमध्ये मागच्या दारातून मदत करत आहे, असा सूर उमटू लागला आहे. तथापि, महासत्ता या नात्याने कोणत्याही देशाला शस्त्रास्त्र किंवा अन्य बाबतीत मदत पुरविणे हे क्रमप्राप्त असल्याचे मत व्यक्त होत आहे.
अमेरिकेची पाकिस्तानला वेळोवेळी मदत
8 सप्टेंबर रोजी अमेरिकेने इ-16 लढाऊ विमानाच्या देखभालीसाठी पाकिस्तानला 450 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 3,581 दशलक्ष रुपये मंजूर केले होते. गेल्या चार वर्षांत इस्लामाबादला दिलेली ही सर्वात मोठी सुरक्षा मदत होती. असे असतानाही पाकिस्तानला सर्वात धोकादायक देश असे वर्णन करणारे बिडेन यांचे वक्तव्य समोर आले आहे.