Panhala Fort Landslide : पन्हाळ्यावरील दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच आहेत. आज सकाळी पन्हाळागडावर जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या मुख्य रस्त्यावरील अत्याधुनिक कठड्याच्या बाजूची जमीन खचली आहे. सकाळी नऊ वाजता जमीन खचल्याची घटना घडली. कठड्याच्या बाजूची जमीन खचल्याने ती केव्हाही खाली कोसळू शकते. यामुळे पन्हाळ्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावऱण पसरले आहे.तर सकाळी साडेआठ वाजल्यापासून दरड कोसळण्यास सुरवात झाली.
गेल्यावर्षी मुख्य रस्ता खचल्याने याठिकाणी कठडा बांधण्यात आला होता. मात्र एका वर्षाच्या आतच कठड्याच्या बाजूची जमीन सरकल्याने तो कटडा केव्हाही कोसळू शकतो. पन्हाळगडावरील चार दरवाज्याच्या पायथ्याची दरड खचायला सुरवात झाली आहे.
Previous Articleबैलपार कासारवर्णे येथील नदीला पूर
Next Article दहावी-बारावीची प्रथम सत्र परीक्षा 10 नोव्हेंबरपासून
Related Posts
Add A Comment