बेळगाव : शास्त्रीनगर येथील कच्छ कडवा पाटीदार सनातन समाज आयोजित कै. केपीएस युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कच्छ कडवा पाटीदार समाज मर्यादित टेनिस बॉईज क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात पाटीदार बॉईज संघाने बैलहोंगल संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. अनिश पोकर याला मालिकावीराने गौरविण्यात आले.
युनियन जीमखाना मैदानावरती खेळविण्यात आलेल्या समाज मर्यादित दोन दिवसांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन प्रसंगी समाजाचे अध्यक्ष जटाभाई पटेल, बाबुभाई पटेल, जादवजी पटेल, लताबेन पटेल, हिनाबेन पटेल, महेंद्र पटेल, अरुण पटेल, विलास पटेल आदी मान्यवरांÑया हस्ते यष्टीचे पूजन व श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत 10 संघांनी भाग घेतला होता. त्यामध्ये बेळगाव, खानापूर, बैलहोंगल, गोकाख, सौंदत्ताr, निपाणी येथील संघांनी भाग घेतला होता. अंतिम सामन्यात पाटीदार बॉईज संघाने बैलहोंगल संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. विजेत्या संघाला एसके इंडस्ट्रिजचे संचालक संदीप पटेल व खिमजीभाई पटेल यांच्या हस्ते विजेत्या पाटेदार बॉईज व उपविजेत्या बैलहोंगल संघाला चषक, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज संजय संखला (खानापूर), उत्कृष्ट गोलंदाज जय पटेल (बैलहोंगल) तर मालिकावीर म्हणून अनिल पोकर (बेळगाव) यांना चषक देऊन गौरविण्यात आले.