पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची बदली मात्र अद्याप नियुक्ती नाही
Pawan Bansod appointed as Sindhudurg Superintendent of Police
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदी औरंगाबाद ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांची नियुक्ती झाली आहे. तर , जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे याचीही बदली झाली असून त्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही.
जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे गेली अडीज वर्षे ते जिल्ह्यात कार्यरत होते कोरोना काळात संयमाची भूमिका घेत कायदा व सुव्यवस्था उत्तम प्रकारे हाताळली विविध आंदोलने ,मोर्चाच्या प्रसंगी अगोदरच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठवून नियंत्रण ठेवून राहायचे त्याची आता गृह खात्याने बदली झाली असून त्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही त्याना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.त्याच्या जागी औरंगाबाद जिल्हा ग्रामीणचे पवन बनसोड यांची नियुक्ती गृह खात्याने केली आहे.
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी