कळंगूट पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांचे कळंगूट येथे प्रतिपादन : कांदोळीत ड्रग्स विरोधात जनजागृती
प्रतिनिधी /म्हापसा
जीवनात अमली पदार्थाची आम्हाला गरज नाही. तसे सर्वांनीच ड्रग्स घेतलेले आहे मात्र तो ड्रग्स वेगळा आहे. वरिष्ठ अधिकाऱयांच्या आदेशानुसार आज आम्ही ड्रग्स विरोधात जनजागृती करीत आहे. आम्ही राज्यातील पोलीस वर्ग चांगले काम करतो फक्त आम्हाला समाजाचा आधार पाहिजे. आम्ही ड्रग्स तणावामध्ये कौटुंबिक भांडणातून स्वतःाचे नियंत्रण संपल्यावर ड्रग्स सेवन करतो असे सर्वेनुसार आढळून आले आहे. मात्र नागरिकांनी आम्हाला ही कारणे देऊन अमली पदार्थ सेवन करणे चुकीचे आहे. आम्हाला अशा गोष्टी नको असे प्रतिपादन कळंगूट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी कांदोळी येथे बोलताना केले. कांदोळी येथील सेंट तेरेझा उच्च माध्यमिक कॉलेजमध्ये आयोजित ड्रग्स विरोधी जनजागृती कार्यक्रमात निरीक्षक सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक किशोर रामानन, प्राचार्य रिटा डिसील्वा, हवालदार केशव नाईक उपस्थित होते.
ड्रग्स सेवन करीत आढळल्यास पोलिसांना माहिती द्या
आपण कळंगुटमध्ये रुजू होऊन अवघे दीड महिना उलटला मात्र आपण या भागात पाहिले आहे, विद्यार्थी वर्ग अतिवेगाने आपल्या दुचाक्या चालवितात. दुसऱयांना वा मुलाना दाखविण्यासाठीच फक्त अतिवेगाने गाडय़ा चालवू नये यात अपघात होऊन बळी जाऊ शकतो. प्रत्येक गोष्टीला वेळ असतो त्या त्या गोष्टी त्या वेळेत व्हायला पाहिजे. विद्यार्थ्यांचे हे वय शिकण्याचे आहे त्या वेळेतच चांगला अभ्यास करा असे सावंत म्हणाले. देव सर्वकडे आहे हे सत्य आहे. देव तुम्हाला अमली पदार्थाच्या आहारी जा असे कधी सांगत नाही. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्हाला कुणी ड्रग्स सेवन करीत असल्याचे दिसल्यास किंवा पाहिल्यास व माहिती मिळाल्यास त्याची माहिती 100 वा 112 क्रमांक वा स्थानिक पोलिसांना द्या अशी माहिती निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी दिली.
अमली पदार्थापासून सर्वांनी दूर राहावे
आज आम्ही काय माहिती देतो त्याची जाणीव घ्या व ड्रग्स विरोधात जनजागृती करा असे सांगून निरीक्षक श्री. सावंत म्हणाले की, गुह्यावर कारवाई करण्याची आमची जबाबदारी आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनीही पोलिसांना सहकार्य करणे तुमचे कर्तव्य आहे असे ते म्हणाले. तुम्हाला पालकांचे महत्त्व कळत नाही. समाजासाठी तुम्ही काय करता ते चांगले आहे, पालकांसाठी बरोबर आहे याचे महत्त्व प्रत्येकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. सर्वांनी अमली पदार्थापासून दूर राहावे असे आपण आवाहन करतो असे निरीक्षक श्री. सावंत म्हणाले. ड्रग्स परिणाम काय होतात, से नो टू ड्रग्स म्हणताना तो सेवन केल्यास त्याचा परिणाम काय होईल याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली असे ते म्हणाले.
बॉक्स करणे
यापुढे गैरकृत्यांना थारा नाही- पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत
आपण कळंगूट भागाड दीड महिन्यापूर्वीच आलो आहे. जरी कळंगूट जगप्रसिद्ध असले तरी येथे ड्रग्स मोठय़ा प्रमाणात मिळतो. असे म्हटले तरी तशी परिस्थिती कळंगुटमध्ये आज नाही आहे. अशी माहिती नवनिर्वाचित निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आम्ही नायजेरीयनवर कारवाई केली आहे. आज एक किलो गांजा पकडला आहे. जे कुणी हा धंदा व्यवसाय करू पाहणार त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आम्ही सतर्क आहोत अशा ड्रग्स पॅडलरची पाळेमुळे हाणून पाडू असे निरीक्षक सावंत म्हणाले.
कर्लीज प्रकरण राज्यात गाजत आहे. पोलीस व ड्रग्स पॅडलर्स यांचे साटेलोटे आहेत हे कितपत खरे आहे यावर प्रतिक्रिया देताना दत्तगुरू सावंत म्हणाले की, असे साटेलोटे म्हणणे सोपे आहे. आम्हालाही पॅमिली आहे. तसे काही नाही आणि करूही देणार नाही. कळंगूट भागात गैरकृत्यांना थारा देणार नाही. काही एजंट टाऊड आहे त्यांना हाकलून लावणार. यापूर्वी जे कोण होते त्यांना 15 ते 20 दिवस आजमध्ये टाकून आम्ही अशा गैरकृत्याबाबत गंभीर आहोत याचा संदेश त्यांच्यापर्यंत पोचविला असल्याची माहिती यावेळी निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी दिली.