प्रतिनिधी /बेळगाव
केएलई कॉलेजचा फार्मसी विभाग व एडीआर मॉनिटरिंग सेंटर यांच्यावतीने राष्ट्रीय फार्माको व्हिजीलन्स सप्ताह साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या क्लिनिकल विभागाचे प्रशासक डॉ. राजशेखर सोमनट्टी उपस्थित होते. त्यांनी या सप्ताहाचे महत्त्व, एडीआर रिपोर्टिंग व त्यामुळे रुग्णाचे उंचावणारे जीवनमान याबद्दल माहिती दिली.
समन्वयक डॉ. एम. एस. गणाचारी यांनी सप्ताहाचा हेतू स्पष्ट केला. उपप्राचार्य डॉ. एम. बी. पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला. डॉ. रमेश भंडारी यांनी एडीआर रिपोर्टिंगबद्दल माहिती दिली. प्राचार्य डॉ. सुनील जलालपुरे यांनी आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी फार्मसी विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. शशिकला वाली यांनी आभार मानले.