26प्रतिनिधी/ बेळगाव
जीवनविद्या मिशनतर्फे 54 वा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली पुण्यस्मरण सोहळा दि. 27 व 28 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रल्हाद वामनराव पै यांचे ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्व शांतीची’ या विषयावर प्रबोधन होणार आहे. धर्मवीर संभाजी उद्यान, महाद्वार रोड, बेळगाव येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत हा सोहळा होणार आहे.