प्रतिनिधी,कोल्हापूर
पोलीस गाडीमध्ये बसून गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्या पोलीसावरच महापालीकेने थेट कारवाई केली. संबंधीत पोलीसाकडून 150 रुपयांचा दंडही वसुल करण्यात आला. शाहूपुरी पोलीस ठाण्यातील हवालदार एस. एस. भाट असे कारवाई झालेल्या पोलिसाचे नांव आहे. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरात हा प्रकार घडला.
शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी एस. एस. भाट हे सकाळी रेल्वे स्थानक परिसरात पोलीस वाहनात बसून, गुटखा खात बसले होते. गुटखा खाउन ते रस्त्यावर थुंकत होते. हा प्रकार थुंकीमुक्त चवळवळीतील काही कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याचे व्हिडीओ चित्रीकरण करुन याबाबतची दाद शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे मागितली. या घटनेचे चित्रीकरण दाखविल्यानंतर शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधून भाट यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडले. महापालीकेच्या पथकाने 150 रुपयांचा दंड वसुल केला.
गुटखा आला कोठून
महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे. मात्र तरीही कर्नाटक आणी सिमा भागातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी केली जात आहे. शनिवारी पोलीस हवालदार भाट याने हा गुटखा कोठून आणला. याची चौकशी पोलीस करणार काय असा सवाल आता नागरीकांच्यातून उपस्थित केला जात आहे.
पोलीस अधिकाऱ्यांकडून आगपाखड
थुंकीमुक्त कोल्हापूर अभियानातील सदस्यांनी हा प्रकार शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या निदर्शनास आणून दिला. याठिकाणी असणारे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र या सदस्यांना अपमानकारक वागणूक दिली. माझ्या कर्मचाऱ्यांना मी बोलावून घेणार नाही तुम्ही बाहेर जावून कारवाई करा असे सुनावले. तसेच समितीच्या सदस्यांना अपमानकारक वागणूक दिल्याने सदस्य संतप्त झाले.
Related Posts
Add A Comment