Prabhakar Bhave Passed Away : ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे (वय ७८) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.ते ब्रेनस्टयूमर आजाराने ग्रस्त होते. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्थिर होती.पुण्यातील मुलीच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या मागे दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. नाट्यसृष्टीत ते भावेकाका म्हणून परिचित होते.
तरुण कलावंतांमध्ये रंगभूमीवरील ‘भावेकाका’ अशी ओळख असलेले प्रभाकर भावे अनेक वर्षे पुरुषोत्तम स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची रंगभूषा करत होते.चेहऱ्याला केवळ रंग लावणे म्हणजे रंगभूषा नाही.भूमिकेनुसार रंगांचा वापर करणे आणि त्यासाठी कमीत कमी रंग वापरणे महत्त्वाचे असते. रंगांचा अतिरेक झाला तर नाटक फसते, अशी भावे यांची धारणा होती. रंगांच्या माध्यमातून व्यक्तिरेखा उभी करता येत नाही, पण व्यक्तिरेखेनुसार योग्य रंगभूषा करता आली तर कलाकार खुलतो. त्याचा परिणाम अभिनयावर होतो.म्हणून रंगभूषा हा नटाला खुलवणारा मानसोपचारच वाटतो,अशी त्यांची भूमिका होती.
Previous Articleभाजप गंगेसारखा; डुबकी मारल्यास होईल पापांची मुक्तता
Next Article मडुरा -सातार्डे रस्ता तातडीने दुरुस्ती करा
Related Posts
Add A Comment