घटप्रभा : गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकातील गुन्हे शाखेत नुकताच रुजू झालेल्या उपनिरीक्षकाचा झोपेतच हृदविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. फकिराप्पा येलबुराप्पा तळवार (वय 54) असे मृत पीएसआयचे नाव आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात महालिंगपूर (जि. बागलकोट) येथील उपनिरीक्षक फकिराप्पा तळवार यांची बदली झाली होती. आठ दिवसांपूर्वी ते गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात रुजू झाले होते. गुरुवारी रात्री काम संपल्यानंतर ते आपल्या खोलीवर झोपले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी फकिराप्पा तळवार कामावर आले नाहीत. तसेच मोबाईलही संपर्क न झाल्यामुळे स्थानिक पोलीस कर्मचारी त्यांच्या खोलीवर गेले असता हृदयघाताने झोपेत मृत्यू झाल्याचे दिसून आले. आठ दिवसांपूर्वी गोकाक येथे कामावर रुजू झाल्यामुळे ते एकटेच खोलीत होते. त्यांचे कुटुंबही याठिकाणी नसल्यामुळे एकटेच राहत होते. ग्रामीण पोलीस चौकशीसाठी गेले असताना खिडकीतून त्यांना फकिराप्पा यांचा झोपेतच मृत्यू झाल्याचे दिसून आले. यानंतर घटनेची माहिती त्यांच्या कुंटुबीयांना देण्यात आली. कुटुंबीय दुपारनंतर गोकाक येथे दाखल झाले. गोकाक शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. कुटुंबाकडे मृतदेह दिल्यानंतर त्यांचे मूळगाव बागलकोट जिल्ह्यातील बिळगी तालुक्यातील शिरगुप्पी येथे अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्यात आले.
Trending
- रस्ते कामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ करा; मनसेचे जिल्हा परिषद सीईओंना निवेदन
- कोल्हापूरच्या फुटबॉलमधून परदेशी खेळाडूंचे पॅकअप !
- Ratnagiri : बांधकाम मंत्र्यांच्या दौऱ्यादिवशी महामार्गावर अपघात, महिला जखमी
- मुंबई- गोवा महामार्गाची एक लेन डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल- मंत्री रवींद्र चव्हाण
- तू स्माईल अँबेसिडर झालास…पण त्यांचं हसू हिरावून घेतलंय; क्लाईड क्रास्टो यांचा सचिनसाठी संदेश
- शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्तांना अडवू नये
- 25 हजाराची लाच घेताना पारगांव ग्रामीण रुग्णालयाचा कर्मचारी मुलास ताब्यात; सहायक अधीक्षकांवरही गुन्हा दाखल
- भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची निवड