डिगस / प्रतिनिधी
पुष्पसेन सावंत उच्च माध्यमिक विद्यालय आणि सिंधुदुर्ग अकॅडमी वाडी हुमरमळा १२ वी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यात प्रथम क्रमांकाने प्रांजल भूपतसेन सावंत (८५.१७%) द्वितीय ओजस मनोज नाईक(८२. ३३ %) कीर्ती नामदेव बागवे ८२. ३३% तर तृतीय अंबर नागेश गावडे ८०. ५० % यांनी यश मिळवले आहे. सदर प्रशालेतून या परीक्षेत 25 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. तरी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष भुपतसेन सावंत तसेच शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांच्याकडून अभिनंदन होत आहे.