तरुणभारत ऑनलाइन टीम
अभिनेता आर. माधवानने चित्रपटसृष्टीत जास्त काम केले नसले तरी त्याचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. सोशल मडिडियावर देखील तो सक्रिय असतो. नुकताचं त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून त्याच्या मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. आर. माधवनचा मुलगा, वेदांत माधवनने कोपनहेगनमधील डॅनिश ओपनमध्ये रौप्य पदक जिंकल आहे.वेदांत हा एक उत्तम जलतरणपटू आहे.
आपल्या मुलाने रौप्य पदक मिळवल्याची व्हिडिओ क्लिप पोस्ट करत अभिनेत्याने लिहिले आहे की, “वेदांत माधवनने कोपनहेगनमधील डॅनिश ओपनमध्ये भारतासाठी रौप्यपदक जिंकले. प्रदीप सर, भारतीय जलतरण महासंघ आणि #ansadxb तुमच्या सर्व प्रयत्नांसाठी खूप खूप धन्यवाद. आम्हाला खूप अभिमान आहे.”अशाप्रकारे त्याने आपला आंनद व्यक्त केला आहे.वेदांतने या आधीही बेंगळुरू येथे झालेल्या 47 व्या ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये चार रौप्य पदके आणि तीन कांस्य पदके जिंकली होती.त्याआधी गेल्या वर्षी मार्चमध्ये वेदांतने लॅटव्हियन ओपन स्विमिंग चॅम्पियन स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.