Sharad Pawar, Rahul Gandhi काँग्रेसचे नेते राहुल गांधी विरोधी पक्षांना राष्ट्रीय पातळीवर एकत्र आणू शकतात, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं. आपण कष्ट करायला तयार आहोत हे राहूल गांधींनी सिद्ध केले आहे, असेही ते म्हणाले. ते रविवारी कोल्हापूरात बोलत होते.
पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, “राहूल गांधींबद्दलचा लोकांचा दृष्टीकोन बदलला असून ते आगामी काळात विरोधी पक्षांमध्ये एकमत घडवून आणण्यात महत्वाची भुमिका बजावतील. रविवारी कोल्हापुरात संवाद साधताना पवार म्हणाले की, “भारत जोडो यात्रा सुरू होण्यापुर्वी सत्ताधारी पक्ष राहूल गांधींची थट्टा करत होता. आता भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) गांधींची प्रतिमा खराब करण्यात गुंतलेल्या भाजपला योग्य उत्तर ठरली आहे. लोकांचा राहूल गांधींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालत जाणे सोपे काम नाही. पण राहूल गांधी ते करत आहेत. माझ्या मते, यामुळे विरोधकांमध्ये एकजुट होण्यास मदत होईल.” असेही पवार म्हणाले.
भारत जोडो यात्रा ही केवळ काँग्रेसपुरती मर्यादित नसून इतर अनेक राजकीय पक्ष, संघटना तसेच महात्मा गांधींच्या विचारसरणीचे लोक यात सहभागी होत असल्याचेही सांगताना शरद पवार म्हणाले. “या यात्रेत मोठ्या संख्येने सामील होत असल्याने सामान्य लोकांकडूनही याला सहकार्य आणि सहानुभूती मिळत आहे.”
Related Posts
Add A Comment