Rahul Gandhi On Narendra Modi : मी याचे पुरावे संसदेत दिले आहेत. त्यानंतर भाजपने ओरड सुरु केली. मला कुणीही घाबरवू शकत नाही. संसदेत मला बोलू दिलं नाही. माझी बाजू ऐकली नाही. संसदेत माझ्यावर खोटे ओरोप केले आहेत. पण मी प्रश्न विचारणं सोडणार नाही. माझ्या कोणत्याही पत्राचं उत्तर दिलं गेलं नाही. माझं म्हणणं मला मांडू का दिलं नाही असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. काल खासदारकी रद्द केल्यानंतर आज राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर हल्लाबोल केला. तर केंद्र सरकारवर निशाणा साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी देशाबद्दल कुठेही चुकीचं वक्तव्य केलं नाही. अदानींच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे. अदानी आणि पंतप्रधानांच नातं नवं नाही. लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अदानीच्या शेल कंपनीत कुणी गुंतवणुक केली? त्यांच्या कंपनीतील 20 हजार कोटी कोणाचे आहेत? माझ्या या प्रश्नाचे उत्तर भाजप का देत नाही असाही सवाल यावेळी त्यांनी केला.
सर्वजण उगाचच नरेंद्र मोदींना घाबरतात.अदानी-मोदी यांच्यातील संबंध उघड का करत नाहीत. पंतप्रधान माझ्या पुढील वक्तव्याला घाबरत आहेत म्हणून माझी खासदारकी रद्द केली असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.