रायगड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता रायगड जिल्हाधिकार्यांची चर्चा करून संपूर्ण स्थितीची माहिती घेतली आणि योग्य ते दिशानिर्देश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत दिली आहे. (Raigad Rain Update)
ट्विटमध्ये ते म्हणतात, महाडमध्ये 9, पोलादपूरमध्ये 13, माणगावमध्ये 1 अशी 23 गावांमधील सुमारे 1535 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सुदैवाने सावित्री नदीने अद्याप धोक्याची पातळी ओलांडलेली नाही आणि ओहोटीमुळे एक मीटरने पाण्याची पातळी कमी होईल, अशी माहिती आहे.
हेही वाचा- कोल्हापूरची पंचगंगा नदी २५ फुटांवर, मुख्यमंत्र्याकडून एनडीआरएफला सज्ज ठेवण्याचे निर्देश
एनडीआरएफच्या तुकड्या तैनात
25 जवानांसह एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, सुदैवाने पाऊस थोडा कमी झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही खाजगी बचाव पथके सुद्धा तैनात करण्यात आली आहेत. सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या नागरिकांसाठी शाळा/समाजभवनात निवास व्यवस्था करण्यात आली आहे. कुठल्याही आपातकालिन स्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. एनडीआरएफ आणि राज्य प्रशासन स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
Related Posts
Add A Comment