Raj Thackeray : लवकरच आपण सत्तेच्या खूर्चीवर बसू लोक सध्याच्या राजकारणाला कंटाळले आहेत. तुम्ही स्वत: स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करा अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना टोला लगावला.या बैठकित त्यांना एकला चलो चा नारा लगावला आहे. शिवसेनेला सहानभूती मिळतेय हा भ्रम आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकित राजकीय घडामोडीवर भाष्य केलं.
यावेऴी बोलताना ते म्हणाले, स्वबळावर लढण्याची तयारी करा.सध्याच्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत. जनता आपल्याकडे पर्याय म्हणून विचार करतेय.मी तुम्हाला सत्तेच्या खूर्चीवर बसवणार आहे. मी स्वत: दुसऱ्याच्या खुर्चीवर उडी मारून बसणार नाही. तुम्ही ‘6 एम’वर लक्ष केंद्रीत करा अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर मनसे अॅक्शन मोडमध्ये आली आहे.
काय आहे ‘6 एम’ फाॅर्म्यूला
मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अॅक्शन मोडवर आली आहे. आज झालेल्या बैठकित राज ठाकरे यांनी ‘6 एम’वर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत . 6 एम म्हणजे मेसेज, मेसेंजर, मनी, मसल, माईंन्ड आणि मेकॅनिझम यावर काम करा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.या निवडणूकीला पेसे लागतील त्याची तयारी आपण करूया. मला तुम्हाला खूर्चीवर बसलेले बघायचे आहे. तुम्ही कामाला लागा असेही त्यांनी सांगितले आहे.
दसरा मेळाव्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, या मेळाव्यात फक्त चिखल फेक करण्यात आली. कोणताही विचार या मेळाव्यात नव्हता. लोक आता याला कंटाळली आहेत. म्हणूनच तुम्ही सकारात्मक विचार पेरले पाहिजेत. उध्दव ठाकरे यांना लोकांतून सहानभूती मिळतेय हा त्यांचा भ्रम आहे असा टोलाही यावेळी लगावला.
Related Posts
Add A Comment