कोल्हापूर – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ६२ वा वाढदिवस बुधवारी राजारामपुरी शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी धडाक्यात साजरा करण्यात आला. ६२०० सदस्य नोंदणी करण्याबरोबरच होतकरू विद्यार्थ्यांना ६२०० वहय़ांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर राजारामपुरीतील मारूती मंदिरात उद्धव ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभावे, ते पुन्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावेत यासाठी अभिषेकही घालण्यात आला.
उद्धव ठाकरे यांचा ६२ वा वाढदिवसाचे औचित्य साधून ६२०० सदस्य नेंदणीचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला. पहिल्याच दिवशी एकहजारहून अधिक सदस्य नोंदणी झाली. सकाळी राजारामपुरीतील मारूतीच्या मंदिरात अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली. यावेळी केक कापून फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. राजारामपुरी परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांना ६२०० वहय़ांचे वाटप करून त्यांना शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख विशाल देवकुळे, महिला आघाडी शहर प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, कमलाकर जगदाळे, रघुनाथ टिपुगडे, राजू सांगावकर, स्मिता सावंत-मांढरे, यांच्यासह शिवसैनिक, भागातील ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
Related Posts
Add A Comment