दि.5.2.2023 ते 11.2.2023 पर्यंत
मेष
आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी परिस्थिती या आठवडय़ात असू शकते. संधी मिळतील पण त्यातील योग्य संधींची निवड करणे महत्त्वाचे ठरेल. या आठवडय़ात जवळच्या व्यक्तींमुळे किंवा त्यांच्या सल्ल्यामुळे किंवा मित्रांच्या अनावश्यक सहभागामुळे काहीसे नुकसान होऊ शकते. तब्येत सुधारण्याकरता नवीन निश्चय कराल. लांबच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी कळेल. तब्येतीला सांभाळणे योग्य ठरेल.
भटक्या कुत्र्यांना खाणे घाला
वृषभ
जे लोक नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत किंवा ज्यांना नोकरीमध्ये बदल हवा आहे त्यांनी प्रयत्न केले तर यश नक्की मिळेल. व्यावसायिकांच्यादृष्टीने हा आठवडा सर्वसामान्य असेल. काही येणी वसूल होतील पण एखादी व्यक्ती पैशाकरता तगादा लावू शकते. कौटुंबिकदृष्टीने हा आठवडा आनंदी असेल. वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येईल.
गाईला एक दिवस पुरेल इतका चारा दान करा
मिथुन
या आठवडय़ामध्ये धार्मिकतेकडे मन वळण्याची शक्मयता आहे. एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी व्हाल. या आठवडय़ाची खासियत म्हणजे लोक तुमच्याकडे मदत मागतील आणि तुम्हाला दुसऱयांच्या मदतीची गरज असेल. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरण्याची शक्मयता आहे. नवीन मैत्रीसंबंध निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी नवीन लोकांच्या ओळखीमुळे फायदा होण्याची शक्मयता आहे. मनातील प्लॅन उघड करू नका.
गरजूला अन्नदान करा
कर्क
या आठवडय़ामध्ये गुंतवणूक करत असताना दहादा विचार करण्याची गरज आहे. नुकसानीची शक्मयता जास्त असल्याने आर्थिक व्यवहार जपूनच करावे लागतील. अति लोभ करू नका. कामाच्या निमित्ताने यात्रा करावी लागू शकते. नोकरी किंवा व्यवसायामध्ये बदल होण्याची शक्मयता आहे. तब्येतीच्याबाबतीत निष्काळजी राहून चालणार नाही. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमुळे अनावश्यक खर्च होऊ शकतो. वस्तू हरवणार नाहीत याची काळजी घ्या.
काळी चादर दान करावी
सिंह
व्यवसाय धंद्यामध्ये प्रगतीचे संकेत आहेत. नोकरी करत असाल तर वादावादी आणि तेथील राजकारणापासून दूर रहा. वैवाहिक जीवनामध्ये ताणतणावाला सामोरे जावे लागण्याची शक्मयता आहे. नवीन एफडी किंवा गुंतवणूक करण्याकरता योग्य काळ आहे. तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्याविषयी इतरांसमोर वाईट बोलू शकते.
पांढरी मिठाई दान करावी
कन्या
सध्याच्या परिस्थितीला धैर्यपूर्वक सामोरे जा. पुढे मिळणाऱया यशाकरता तयारी करण्याकरता योग्य वेळ आहे. सध्या संधींची कमतरता असली तरी शोधकदृष्टीने परिस्थितीकडे पहात रहावे. आपली वेळ आली की सगळय़ा दृष्टीने नशीब साथ देईल. परिवारात कलहाचे वातावरण असेल. तुमच्या विरोधकांना तुमच्याविषयी कोणतीही कारवाई करण्याची संधी देऊ नका. कामाच्या ठिकाणी आपली माणसे ओळखण्याची गरज आहे.
लहान मुलींना बत्तासे वाटा
तूळ
व्यावसायिकांना मोठय़ा संधींची गरज असेल आणि तशा संधी प्राप्तही होतील. पण गुंतवणूक करत असताना आपली आर्थिक परिस्थिती ओळखूनच करावी. नोकरीत काम करणाऱयांना बढतीचे किंवा पगारवाढीचे योग आहेत. विदेश प्रयाणाकरता प्रयत्न करत असाल तर उत्तम संधी प्राप्त होतील. जे आय टी मध्ये काम करतात त्यांना ताण तणावाला सामोरे जावे लागेल. वैवाहिक जीवन उत्तम असेल.
पक्ष्यांना दाणे घालावेत
वृश्चिक
ऐकावे जनांचे करावे मनाचे असे धोरण ठेवल्यास नुकसान कमी आणि फायदा जास्त होईल. मित्रांपैकी एखादी व्यक्ती आर्थिक बाबतीमध्ये चुकीचा मार्ग दाखवू शकते, सावध राहावे. आठवडय़ामध्ये पोटाच्या समस्या त्रास देऊ शकतात. आर्थिक सुसंधी प्राप्त होतील. समाजातील मानसन्मान वाढेल. तुम्ही केलेल्या समाजकार्याचे कौतुक होईल. एखादा मित्र मदत मागू शकतो पण तुमच्या व्यस्ततेमुळे मदत करण्यास असमर्थ ठराल.
काळे पांढरे वस्त्र दान करावे
धनु
तुमचे कौशल्य वाढवण्यासाठी हा आठवडा उत्तम असेल. विद्यार्थीवर्ग नवीन एखादा कोर्स करून ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न करतील. ज्ये÷ व्यक्तींची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या स्त्रीमुळे कामात अडथळे येण्याची शक्मयता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जाणकार व्यक्तीच्या सल्ल्यामुळे फायदा होईल. मनातील योजना प्रत्यक्षात आणण्याकरतासुद्धा हा आठवडा उत्तम आहे. तब्येतीकडे लक्ष द्यावे.
पांढरी मिठाई दान द्यावी
मकर
या आठवडय़ात तुम्ही काहीसे आळसावलेले असाल. कामे पूर्ण करण्यामध्ये तुमचा इंटरेस्ट थोडा कमी असेल पण मनात नसतानादेखील कामे करावी लागतील. आठवडय़ाची सुरुवात एखाद्या चांगल्या घटनेने होईल. जवळच्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. आर्थिकदृष्टीने काहीसे असमाधानी असाल. करियरमध्ये पुढे घडणाऱया चांगल्या घटनांचे संकेत मिळण्याचे योग आहेत. सूचक स्वप्ने पडल्याने तुम्हाला काहीसे आश्चर्य वाटेल.
झोपताना डोक्मयाकडे पाणी ठेवून सकाळी झाडांना घालावे
कुंभ
आपल्या कामांकडे लक्ष द्या आणि आळसाला दूर झटका. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करावा. घरातील एखाद्या सदस्याच्या करिअरमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. या आठवडय़ात आर्थिक नियोजन ढासळेल. प्रकृतीकडे नीट लक्ष दिले नाही तर आजाराला निमंत्रण दिल्यासारखे होईल. हा आठवडा व्यावसायिकांना उत्तम असेल. जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न करा.
गाईला गोड चपाती घालावी
मीन
आर्थिक उन्नती होण्याचे संकेत आहेत. नोकरदार वर्गाला पगारवाढ किंवा बढती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वरि÷ांचा सहयोग प्राप्त होईल पण त्याकरता आपले काम चोख करणे गरजेचे असेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱया विद्यार्थ्यांना यश प्राप्तीचे योग आहेत. या काळात तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार कराल. वेगवेगळय़ा समारंभांना हजेरी लावू शकता. घरातील व्यक्तींना तुमचा सल्ला मोलाचा वाटेल.
मनगटावर पिवळा धागा बांधावा.
टॅरो उपायः- वारंवार धनहानी होत असेल तर लाल कपडय़ामध्ये दोन अस्सल पिवळय़ा कवडय़ा बांधून तिजोरीत ठेवाव्यात. चपाती केवळ एका बाजूने भाजावी. भाजलेल्या बाजूवर तेल लावून त्यावर थोडे खडे मीठ आणि दोन लाल मिरच्या ठेवाव्या. घराच्या मुख्य दरवाजावरून ही चपाती सात वेळा वरून खाली ओवाळून चार रस्ते मिळतील तिथे गुपचूप ठेवून द्यावी.