कालसर्पाची पुंगी! वाजवतो कोण आणि वाजते कुणाची
(भाग 3-हाय काय अन न्हाय काय!)
एकदा कालसर्प दोष नावाचा प्रकार शोधून काढला की त्याचे प्रकार आले. 12 प्रकारच्या सापांना (अनंत, वासुकी, शंखपाल, पद्मनाभ, कंबल, करकोटक, अश्वतार, धृतराष्ट्र, कालिया, तक्षक, पिंगळ आणि शेष) राहू आणि केतू यांच्या कुंडलीतील स्थानावरून 12 प्रकारच्या काल सर्प योगांची नावे देण्यात आली. काही महाभागांनी 288 प्रकारचे कालसर्प शोधून काढले. बरं त्यात पूर्ण कालसर्प वेगळा आणि अर्ध कालसर्प (जिथे एखादा ग्रह सुटतो बिचारा) वेगळा! म्हणून प्रश्न पडला की कालसर्प योगाची पुंगी वाजवतो कोण? पण वाजते मात्र सामान्य माणसाची, जातकाची. मग चला त्र्यंबकेश्वरला, गोकर्णला, वाडीला, कुक्के सुब्रमण्यमला आणि करा शांती! बरं थोडेथोडके पैसे नाही तर हजारो रुपयांचा चुराडा! जाण्यायेण्याचा खर्च, राहण्याचा, खाण्यापिण्याचा खर्च तो वेगळाच आणि यातून निष्पन्न काय? तर रिझल्ट मिळण्याची कोणतीही शाश्वती नाही. काही ज्योतिषांनी आपले एजंट त्या तीर्थक्षेत्री ठेवले आहेत. म्हणजे ज्योतिषांचे कमिशन वेगळेच. कधी थांबणार हा प्रकार? समोरच्या व्यक्तीला ज्योतिषाचे ज्ञान नाही म्हणून पत्रिकेत तसे ग्रहयोग नसतानासुद्धा शांत करून घेणारे महाभाग आहेत. याहून हास्यास्पद गोष्ट म्हणजे काही लोक कालसर्प योगाचा संबंध पूर्वजन्माशी लावतात. म्हणे पूर्वजन्मामध्ये जर व्यक्तीने नाग साप मारला असेल तर त्याच्या कुंडलीत कालसर्प योग येतो. आता साधे गणित बघा, फक्त आपल्या भारताची लोकसंख्या 130 कोटी इतकी आहे. साधारणपणे 40 टक्के लोकांच्या कुंडलीमध्ये पूर्ण किंवा अर्ध किंवा काल अमृत असा योग असतो. म्हणजे 52 कोटी लोकांनी आपल्या पूर्वजन्मात सर्प हत्या आणि त्यातही नागाची हत्या केली आहे. आता मला सांगा 52 कोटी नाग साप आपल्या देशात असू शकतात का? तसे झाल्यास पावलोपावली आपल्याला नाग दिसायला हवा. दुसऱया शब्दात दर दोन माणसाच्या मागे एक नाग साप असायला हवा, हे हास्यास्पद नाही का? यात थोडेसे सूक्ष्म जाऊया. वर सांगितल्याप्रमाणे कित्येक ज्योतिषी (?) पत्रिका बघितली रे बघितली आणि हे लक्षात आले की राहू आणि केतू यांच्या एका बाजूला सगळे ग्रह आहेत तर छातीठोकपणे सांगतात की ही कालसर्पाची कुंडली आहे. कॉम्प्युटर सॉफ्टवेअरला डोके नसते म्हणूनच ज्याप्रमाणे मंगळ कुठल्या राशीत कुठल्या भावात किती डिग्रीवर आणि चलित कुंडलीत कुठे बसला आहे याचा विचार न करता मांगलिक योग किंवा नुसतेच मांगलिक असे पिंट होऊन येते. त्याचप्रमाणे कंडिशन चेक न करता कालसर्प योग असे पिंट होऊन येते. सॉफ्टवेअरला डोके नसते हे मान्य पण ज्योतिषीसुद्धा कुठलाही विचार न करता कालसर्पाची कुंडली आहे ‘के.एस.वाय.’ असा शिक्का मारून मोकळे होतात. राहू आणि केतू हे नेहमी वक्रीच असतात. मुळात ते ग्रह नाहीतच. ते छेदन बिंदू आहेत. जर राहूने बाकीच्या ग्रहांना गिळलेच नसेल, म्हणजे राहुच्या तोंडासमोर जर बाकीचे ग्रह असतील तर कालसर्प योग कसा होतो? दुसरा मुद्दा, राहू ज्या स्थानात आहे त्याबरोबर इतर काही ग्रह असतील आणि त्यांच्या डिग्री पाहिल्यास त्यामध्ये बरेच अंतर असेल तर मग कालसर्पयोग कसा होईल? ज्योतिषशास्त्रात 12 भाव, 12 राशी आणि 12 ग्रह यांचे परम्यूटेशन आणि कॉम्बिनेशन पाहिले जाते. ग्रहांचा परस्परांशी असलेला संबंध, भावाचे आणि राशींचे गुणधर्म यावर ज्योतिषशास्त्राचा डोलारा उभा असतो. ग्रहांच्या या एकमेकांशी असलेल्या संबंधापैकी एक संबंध म्हणजे हा सो कॉल्ड कालसर्प योग इतकेच.
महा उपायः लहान मुले झोपेतून दचकून उठतात. कित्येक लोकांना झोपेत वाईट स्वप्ने पडतात आणि त्यामुळे नंतर झोप येत नाही. अशावेळी रविवारी आणि मंगळवारी झोपताना उशीखाली तुरटीचा तुकडा ठेवावा. शांत झोप लागण्यास मदत होते.
सोपी वास्तू टिपः कधीही गळका नळ घरी असू नये. पाण्याच्या टप टप आवाजामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तब्येतीवर परिणाम होतो.
मेष
जे काम कराल ते आत्मविश्वासाने कराल. नवीन कल्पना सुचतील. कौटुंबिक सुख उत्तम असेल. कुटुंबातील सदस्य एकमेकाला सहयोग करतील. सहलीला जाताना ते ठिकाण धोकादायक नाही ना याचा विचार करा. आईची थोडी चिंता वाटेल. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. नोकरदार वर्गाने कामात चूक होऊ देऊ नये. जोडीदाराशी मतभेद संभवतात. व्यवसायात प्रगती होईल.
उपायः पंचगव्याचे सेवन करावे.
वृषभ
घरातील काही सदस्यांबरोबर खटके उडाल्याने मन थोडे उदास राहील. जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. भाग्याची साथ आहे. खर्चाचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे अनावश्यक खर्च टाळावा. तब्येत ठीक राहील. प्रवासाला जावेच लागले तर सोबत पाच लवंगा ठेवाव्यात. जमिनीचे व्यवहार सध्या नकोत. शेअर्ससारखी धोकादायक गुंतवणूक टाळावी.
उपाय ः तांब्याचे कडे घालावे.
मिथुन
आरोग्याविषयी गाफिल राहून चालणार नाही. छोटा मोठा आजार त्रास देऊ शकतो. पोटाची तक्रार किंवा त्वचेविषयी समस्या येऊ शकते. कुटुंबाच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. साहस वाढेल. एखादे मोठे काम करण्याची योजना आखाल. प्रेमींनी वाद-विवाद टाळावा. संततीची काळजी वाटेल. नोकरीत प्रमोशन किंवा इनक्रिमेंट अपेक्षित आहे. वैवाहिक जोडीदाराशी विनाकारण वाद होईल.
उपाय ः मुंग्यांना साखर घालावी.
कर्क
अपचन होणे किंवा दूषित अन्न खाल्ल्याने तब्येत बिघडू शकते. पैशाची आवक ठीकठाक राहील. प्रवास टाळावा. वाहनविषयक तक्रार जाणवेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. संततीकडून सुवार्ता कळेल. प्रेमींना उत्तम काळ आहे. नोकरीत सोबत काम करणाऱयांमुळे किंवा वरि÷ांमुळे त्रास होईल. वैवाहिक सुख उत्तम असेल. समाजात मानसन्मान वाढेल. सगळय़ा प्रकारचे लाभ होतील.
उपाय ः रात्री दुधाचे सेवन करू नये.
सिंह
पैशाची येणी कमी झाल्यामुळे थोडे त्रस्त व्हाल. कुटुंबात वाद संभवतो. एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या बोलण्याने वादावादीची शक्मयता आहे. जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील. वाहन खरेदीचे योग आहेत. धोकादायक गुंतवणूक टाळावी. प्रेमींनी योग्य वेळेची प्रतीक्षा करावी. नोकरीत मानसन्मान वाढेल. एखाद्या जवळच्या ठिकाणी सहल काढायचा विचार कराल. व्यवसायामध्ये वाढ होईल.
उपाय ः पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे.
कन्या
प्रवासातून ओळखी होतील आणि त्याचा फायदा होईल. लेखकांना उत्तम दिवस आहेत. लहान भावंडांची आणि शेजाऱयांची साथ मिळेल. मोठे काम हाती येईल. गुंतवणुकीतून फायदा होईल. करमणुकीकडे किंवा मौजमजेकडे कल असेल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद टाळावे. नोकरदार वर्गाला जास्त कष्ट करावे लागतील. एखादी गुप्त बातमी कळेल. अचानक धनलाभाचे योग आहेत.
उपाय ः लहान मुलीला हिरव्या बांगडय़ा द्याव्यात.
तूळ
तब्येतीला सांभाळून राहणे अत्यंत गरजेचे आहे. कुठल्याही प्रकारचा आजार त्रास देऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सगळय़ांना बरोबर घेऊन काम करणे योग्य ठरेल. एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल अफवा पसरवू शकते. धनाचे आगमन आणि व्यवस्थापन उत्तम असेल. कौटुंबिक समाधान लाभेल. वाहन किंवा जमिनीविषयी व्यवहार पूर्ण होतील. नोकरदार वर्गाला वरि÷ांकडून सहकार्य मिळेल.
उपायः गाईला चपाती आणि खीर खाऊ घालावी.
वृश्चिक
तब्येत खुश तर आपण खुश असा मूड असेल. आरोग्याची तक्रार दूर होईल. येणी वसूल करायला प्रयत्न करावे लागतील. कुटुंबातील एखाद्या ज्ये÷ व्यक्तीशी वाद होऊ शकतो. प्रवासाचे योग आहेत. लहान भावाचे सहकार्य प्राप्त होईल. नोकरदार वर्गाला कष्टाचे फळ मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. धोकादायक गुंतवणूक करू नये. एखाद्या व्यक्तीकडून फायदा होईल.
उपाय ःहिरवे वस्त्र दान द्यावे.
धनु
कोणाशीही व्यवहार करत असताना अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. परिचित किंवा अपरिचित लोक हातोहात फसवू शकतात. कौटुंबिक वातावरणात फरक पडेल. पैशांच्या बाबतीत गाफिल राहून चालणार नाही. येणी वसूल करण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. प्रेमींना अनुकूल काळ नाही, सावध रहावे. वैवाहिक जीवनामध्ये कडू-गोड अनुभव येईल.
उपाय ः घरात गोमूत्र शिंपडावे.
मकर
ज्याचे करावे भले तो म्हणतो आपलेच खरे याचा पदोपदी अनुभव येईल. म्हणून न मागता सल्ला देऊ नका. दुसऱयाच्या अनुभवाचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्मयता आहे. समाजामध्ये मान-सन्मान वाढेल. पैशांची आवक सर्वसामान्य राहिल. गुडघ्याला किंवा पायाला दुखापत होण्याची शक्मयता आहे. वाहन जपून चालवावे. वैवाहिक जीवन उत्तम असेल.
उपाय ः कुत्र्याला चपाती घाला.
कुंभ
आरोग्याची उत्तम साथ असली तरीसुद्धा कुपथ्य करून चालणार नाही. कामाचा व्याप वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा व्यवहार तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. तुमचे पैसे परत मागण्याकरता तुम्हाला खटाटोप करावा लागेल. आर्थिक बाजू भक्कम असेल. कौटुंबिक वातावरणात सुधारणा होईल. प्रेमींनी संयम राखावा. वैवाहिक जीवनामध्ये उतार-चढाव येतील.
उपाय ः नागकेशराचे पाच दाणे जवळ ठेवावे.
मीन
तुमच्या कामाचे कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी बढती किंवा पगारवाढीची शक्मयता आहे. गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढतील. ऑफिसमध्ये राजकारण तापेल. या सगळय़ापासून दूर राहणेच ठीक. पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, वेळेवर औषधोपचाराने फायदा होईल. जुनी येणी वसूल करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. छोटी गुंतवणूक धोकादायक ठरू शकते. संततीचा प्रश्न मार्गी लागेल.
उपाय ः तुळशीला हळदीचे पाणी घाला.