अमिताभ बच्चनसोबत दिसणार नॅशनल क्रश
दक्षिणेतील अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा चित्रपट ‘गुडबाय’ 7 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. विकास बहल यांच्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, नीना गुप्ता आणि रश्मिका हे कलाकार आहेत. रश्मिकाचा हा पहिला हिंदी चित्रपट असून यात एली एवराम, सुनील ग्रोव्हर, साहिल मेहता देखील दिसून येतील. या फॅमिली ड्रामाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला लुक शेअर केला आहे. पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन, रश्मिका मंदाना आणि नीना गुप्ता आणि इतर कलाकार टीव्हीसमोर एका लिव्हिंग रुममध्ये बसलेले दिसून येत आहेत.

विकास बहल दिग्दर्शित गुडबाय या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरची कंपनी बालाजी मोशन पिक्चर्स असोसिएटकडून केली जात आहे. हा चित्रपट 7 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी याला ‘लाइफ, फॅमिली आणि नात्यांवर एक मनस्पर्शी कहाणी’ म्हणून सादर केले आहे.
‘गुडबाय’सह रश्मिका आणखी दोन हिंदी चित्रपटांमध्ये काम करत आहे. रणवीर कपूरसोबत ‘ऍनिमल’ आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात ती दिसून येणार आहे. याचबरोबर ‘पुष्पा ः द रुल’मध्ये श्रीवल्लीच्या भूमिकेत ती पुन्हा दिसून येणार आहे. मागील वर्षी ब्लॉकबस्टर ठरलेला ‘पुष्पा ः द राइज’चा हा दुसरा भाग आहे. अल्लु अर्जून आणि फहद फासिल यांचा हा चित्रपट डिसेंबर महिन्यात झळकणार आहे.