Ratnagiri Cylinder Blast : रत्नागिरीतील शेट्येनगर येथे झालेल्या स्फोटाने रत्नागिरीला हादरवून सोडले.या सिलिंडरच्या स्फोटात दोन महिलांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. सिलिंडरच्या स्फोटानंतर स्लॅबखाली तीन तास या महिला अडकल्या होत्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना पहाटे 5 च्या सुमारास घडली, त्यात दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान,अश्फाक काझी पहाटे 5 च्या सुमारास घरी आले आणि त्यांनी लाईट लावली.यावेळी स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे.
शेट्येनगर येथे दोन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हा सिलिंडरचा स्फोट झाला.पहाटेच्यावेळी स्फोटचा आवाज झाल्याने मोठा गोंधळ उडाला. स्फोटाच्या आवाजाने काही जण जागे झाले त्यावेळी इमारतीत आगीने रौद्र रूप धारण केले होते. सिंलिंडर स्फोटानंतर आगीचा मोठा भडका उडाला. यावेळी कुटुंबातील चार जण अडकले होते.त्यापैकी दोघांना बाहेर काढण्यात यश आले.मात्र,दोन महिला घरातच अडकल्या होत्या.या दोघींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.तसेच 4 जण जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Related Posts
Add A Comment