प्रतिनिधी, रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 9 शिक्षकांचा समावेश आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत केली.मात्र यावर्षी विशेष पुरस्काराला बगल देण्यात आले असल्याची चर्चा सुरु आहे.
शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. जिल्हा परिषद शिक्षण विभाग स्तरावरून दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी जिल्हाभरातून 22 जणांनी प्रस्ताव दाखल केले होते. गेल्या महिन्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या होत्या. यानंतर त्या मंजुरीसाठी कोकण आयुक्त कार्यालयात पाठवण्यात आल्या. गुरूवारी हे
पुरस्कार जाहीर झाले. यावेळी शिक्षण अधिकारी वामन जगदाळे, आर. के. कांबळे आदी उपस्थित होते.
हे पुरस्कार जाहीर करताना मागील 5 वर्षाचा गोपनीय अहवाल, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, शैक्षणिक संशोधन लेखन, व्याख्यान व संमेलनातून शैक्षणिक कार्य, साक्षरता अभियान शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शैक्षणिक
पात्रता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न, शैक्षणिक मार्गदर्शन परीक्षा, शालेय कामाबाबत वरिष्ठांचा अभिप्राय, शैक्षणिक उठाव आदी मुद्यांचा विचार करून हे पुरस्कार देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या पुरस्कारांचे दरवर्षी 5 सप्टेंबर या शिक्षकदिनी वितरण केले जाते. हे पुरस्कार 5 सप्टेंबरच्या अगोदर जाहीर झाले असले तरी त्याचे वितरण या वेळेस शिक्षकदिनी होणार नसल्याचे शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे पुरस्कार पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. मंत्र्यांची वेळ घेऊन हे वितरण होणार असल्याचे
सांगण्यात आले. यावर्षीही हे पुरस्कार वेळेत जाहीर झाल्याने शिक्षकांतही समाधानाचे वातावरण पसरले आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार पाप्त शिक्षक पुढीलप्रमाणे:
पुंडलिक शिंदे (शिपोले, ता. मंडणगड)
मुस्ताक तांबे (उर्दू शाळा विसापूर,,दापोली)
संतोष देवघरकर (कर्जी, ता. खेड)
प्रांजली चव्हाण (मांजरेकोंड ता. चिपळूण)
माधवी पाटील (कुडली नं. 4, ता. गुहागर)
सुनील बोडेकर (हरपुडे नं. 2, ता. संगमेश्वर)
दिलीप भांडावले (पावस नालेवठार, रत्नागिरी)
मृगया मोरे (जि. प. शाळा येरवडे, लांजा)
लक्ष्मण घाडीगावकर (सागवे कात्रादेवी, राजापूर) यांचा समावेश आहे.
Previous Articleभारत-चीन सीमेवर दगडूशेठच्या प्रतिकात्मक मूर्तीची प्रतिष्ठापना
Related Posts
Add A Comment